आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्शन ड्रामा:‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार अभिनेत्री प्रियंका चोप्रा

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियंका चोप्रा सध्या आपल्या नवी वेब सिरीज ‘सिटाडेल’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आता प्रियंकाने डब्लूडब्लूई चॅम्पियन जॉन सीनासोबत मोठा प्रोजेक्ट साइन केला आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे एक चित्रपट आहे, ज्याचे नाव’ हेड्स ऑफ स्टेट’ आहे. सूत्रानुसार, या हॉलीवूड चित्रपटावर याच वर्षी मे महिन्यात काम सुरू होणार आहे. याची माहिती प्रियंकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पुढच्या दिवशी.’ तसेच पीसीने जॉन सीना आणि इद्रिस एल्बाला टॅग करत ‘लेट्स गो’ लिहिले आहे. प्रियांका सध्या भारतात आली आहे. ती प्रत्येक कार्यक्रमात मालिकेचे प्रमोशन करताना दिसत आहे. रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या मालिकेच्या प्रीमियरमध्ये प्रियांकासह तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेनही होता. या मालिकेत खोटे, कपट, साहस आणि सस्पेन्स सर्व काही दिसणार आहे. ही मालिका २८ पासून प्रवाहित होईल. इतर कामाविषयी बोलायचं झालं तर प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफदेखील आहेत. याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे.