आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्ट्स ड्रामा:आर बाल्कीच्या ‘घूमर’मध्ये अभिनेत्री सैयामी खेरची वर्णी

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक आर बाल्की सध्या त्यांच्या आगामी ‘घूमर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘घूमर’ हा दिव्यांगांच्या खेळावर आधारित चित्रपट असून त्यात एका दिव्यांग क्रिकेटरचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो एका महिला क्रिकेटपटूचा प्रशिक्षक बनला आहे. आता सैयामी खेरदेखील या चित्रपटाचा भाग बनल्याची बातमी आहे. याबद्दल सैयामी म्हणाली, “मी लहानपणापासून क्रिकेट खेळले, पण हे पात्र आव्हानांनी भरलेले आहे, कारण यामध्ये मी डाव्या हाताच्या गोलंदाजाची भूमिका साकारली आहे. पॅरा ऍथलीटला आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, त्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. देशासाठी खेळताना पदक मिळवून देणाऱ्या पॅरा अॅथलिट्सच्या तुलनेत संघर्ष काहीच नाही.” या दोघांशिवाय शबाना आझमीही या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...