आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटिंग शो:‘डेटबाजी'त खास पाहुणी बनून येणार अभिनेत्री शिल्पा शेट्टी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅमेझॉन मिनी टीव्हीचा ‘डेटबाजी' कार्यक्रम ऋत्विक धनजानी होस्ट करत आहे. आता या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीही खास पाहुणी बनून येणार आहे. त्यात ती डेटिंग आणि कपलच्या रिलेशनशिपवर संवाद साधताना दिसणार आहे. तिने शो चा प्रोमो आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर शेअर केला आहे. रेम्स प्रॉडक्शन्सने ही निर्मिती केली आहे. माता-पित्यांना त्यांचे मूल कोणासोबत डेटवर जाणार, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य देणारा हा शो आहे. त्याचे एकूण २० भाग प्रदर्शित होणार आहेत. चौथ्या भागात खास पाहुणीच्या रुपात शिल्पा शेट्टी सहभागी होणार आहे. दुसरीकडे शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टी यांच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासमवेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉयही दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...