आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत : अदा शर्मा:‘कमांडो 4’मध्ये कॉमेडीपेक्षा जास्त अॅक्शन करताना दिसेल अदा शर्मा

अमित कर्ण मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुल अमृतलाल शहांच्या ‘कमांडो ’ फ्रँचाइजमध्ये आतापर्यंत विद्युत जामवाल अॅक्शन करताना दिसला आहे. खर ंतर, याच्या चौथ्या भागात अभिनेत्री अदा शर्माकडूनही हार्डकोअर अॅक्शन करून घेतली आहे. स्वत: अदा शर्माने खास बातचीतमध्ये याला दुजोरा दिला. अदाने सांगितले...‘या फ्रँचाइजमध्ये माझे भावना रेड्डीचे पात्र नेहमीच कॉमेडी करत आले आहे. मात्र या वेळेस भावना म्हणून मी यात भरपूर अॅक्शन केली आहे. मी यात भारतीय मार्शल आर्ट मिक्स केले. यासोबतच मी सिलंबमचे अॅक्शनदेखील अॅड केलेे. सिलंबमला उत्तरेत काठी म्हणतात. कमांडो ४ मध्ये मी काठी चालवताना दिसणार आहे. नान चाकूचा वापर केला अदाने पुढे सांगितले...‘ब्रूस ली ज्या चाकूचा वापर करत होते त्या नान चाकूचा आम्ही यात वापर केला आहे. दोन्ही गोष्टी धोकादायक होत्या. थोडीही चूक झाली असती तर समोरच्या कलाकाराला मार लागला असता. प्रशिक्षणादरम्यान आम्ही खूपच सजग राहून काम करत होतो. खरं तर, चित्रपटांमध्ये अॅक्शन आणि स्टंट करताना होणाऱ्या दुखापतींबद्दल खूप चर्चा होते. पण ते करण्यापूर्वी कोणते सुरक्षेचे उपाय अवलंबले जातात याची चर्चा कमी होते. खरं तर, प्रत्येक अॅक्शन सीन चित्रित करण्यापूर्वी स्टंट टीम शेकडो वेळा रिहर्सल करते. त्यामुळे कोणाला दुखापत तर होणार नाही याची आम्ही काळजी घेताे.

माझे पात्र अंडरकव्हर एजंटचे कमांडो ४ मधील अॅक्शन जेम्स बाँड सिरीजमधील अॅक्शन करणाऱ्या अभिनेत्रीपेक्षा वेगळे राहिल. याविषयी अदा म्हणाली, जेम्स बाँड सिरीजमध्ये अभिनेत्रींचे अॅक्शन नेहमी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये खलनायकाच्या पार्टी दरम्यान होते. त्यात अभिनेत्री डिझायनर कपड्यांत राहते. अशावेळी अभिनेत्री त्यात गाऊनमध्ये असते. त्यातच अॅक्शन करते. कमांडो ४मध्ये मी अंडरकव्हर एजंट बनली आहे. त्यामुळे मी मोकळे केस आणि लाल गाऊनमध्ये अॅक्शन करताना दिसणार नाही.

हीरो-हिरोइनसाठी समान अॅक्शन असावी अदा सांगते.. ‘कंगनाचा ‘धाकड’ हा अॅक्शनपट होता. मात्र, मी तो पाहिला नाही कारण त्यावेळी मी शूटिंग करत होते. या वर्षी माझे पाच ते सहा प्रकल्प येत आहेत. हीरो आणि हिरोइनला जर समान अॅक्शन भूमिका दिल्या तर प्रेक्षक त्याला लैंगिक नजरेतून पाहणार नाही. समान कामाला कोणीच मतभेद करू शकत नाही. चित्रपट पाहून कमालीची अॅक्शन होती, अशा प्रतिक्रिया येतील, असे मला वाटते. कुण्या एकाचेच यात कौतुक होणार नाही, असे वाटते.

माझा येणारा चित्रपट द गेम ऑफ गिरगिट अदा तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगते, याबरोबरच ‘द गेम ऑफ गिरगिट’ नावाचा चित्रपटही या वर्षी माझ्याकडे आला आहे. त्यात मी पोलीस बनले आहे. राणी मुखर्जीच्या मर्दानीप्रमाणे. त्यात माझी भूमिका लार्जर दॅन लाइफसारखीआहे. येथे मला सुपरहिरोसारखे बनवले गेले आहे. दुसरा चित्रपट म्हणजे टिब्बा. तारे जमीं पर मधील दर्शील सफारीसोबत आहे. एक मोठी वेब सिरीजही आहे, त्याचे शूटिंगही अर्धे पूर्ण झाले आहे.

‘द केरला स्टोरी’चे शूटिंग मुंबई आणि केरळमध्ये झाले सत्यघटनेवर आधारित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अॅक्शनबरोबरच अदा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा पहिला टीझर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी रिलीज झाला होता. अदाच्या शब्दांत... ‘ही वेब सिरीज नाही. हा एक योग्य वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. तो फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा दुसरा टीझरही लवकरच लाँच होणार आहे. माझे पात्र केरळचे आहे, मात्र ती चांगली हिंदी बोलते. त्या पार्श्वभूमीवरून मलाही त्यात कास्ट केले. याचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. मुंबई, केरळमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपट ज्या विषयावर आधारित आहे, त्या विषयाच्या वेदनेची मी तुलनाही करू शकत नाही. मी काम करते आणि घरी जाते. तेथे दरवर्षी हजारो मुली बेपत्ता होतात. आपण विचारही करू शकत नाही. त्यांच्या दु:खाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.