आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधीचे शिर्षक बेनाम:अजय देवगणचा ‘नाम’ चित्रपट 1500 पडद्यांवर होऊ शकतो प्रदर्शित; ओटीटीसाठीही प्रयत्न

मुंबई | अमित कर्ण9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगणचा चित्रपट ‘नाम : द मिसिंग आयडेंटिटी’ १० वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रदर्शित होत आहे. अजयला लाँच करणारा निर्माता दिनेश पटेलचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर दिनेश यांचा मृत्यू झाला होता. नंतर दिनेशवर जे कर्ज झाले होते, त्याचा हिशेब करण्यात इतकी वर्षे गेली आणि चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत पडून राहिला. यादरम्यान त्याचे शीर्षकदेखील ‘बेनाम’वरून बदलून ‘नाम’ ठेवण्यात आले. त्यानंतर सुरतचे बिल्डर अनिल रुंगटा यांनी टेकओव्हर केले. अनिल निर्माते म्हणून आपली सुरुवात करत आहेत. पुढच्या दोन वर्षांत ते थिएटर्सची चेनदेखील लाँच करणार आहेत. चित्रपटाविषयी त्यांनी दिव्य मराठीशी खास चर्चा केली....

मनाली, मुंबई आणि स्वित्झर्लंडमध्ये झाले शूट : अनिल रुंगटा अनिल यांनी सांगितले...‘या चित्रपटाचे शूटिंग २०१२ मध्ये सुरू झाले होते. मात्र शूटिंग सुरू असतानाच दिनेशजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर बाजाराचे जे कर्ज होते त्याचा हिशेब करण्यास बरीच वर्षे लागली. फायनली पहिल्या लॉकडाऊनंतर आम्ही निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. दिनेश पटेल आमच्या एका मित्राच्या ओळखीचे होते. मला या चित्रपटाची कथा आणि ट्रीटमेंट आवडले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता होण्याचे ठरवले. आम्ही पुढे थिएटर्सची चेनदेखील आणणार आहोत. आम्ही देशभरात २०० थिएटर्स आणणार आहोत. चित्रपटाचे शूटिंग मनाली, मुंबई आणि स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे.

स्मृतिभ्रंश होण्याचा आजार असतो हीरोला

अनिलने सांगितले....यात अजय एका तरुणाच्या भूमिकेत आहे, त्याला भूतकाळाबद्दल काहीच माहिती नसते. तो अमर, मायकेल आहे की अब्दुल, याचा तो शोध घेतो. त्या तिघांच्या रूपात तो चांगला माणूस की वाईट त्याला आठवत नाही. गुंड आणि पोलिस त्याच्या मागे लागलेले असतात. अशा परिस्थितीत अजयचे पात्र त्याचे आयुष्य आणि ओळख अशा दुहेरी अडचणीत सापडते. हा चित्रपट ‘दीवानगी’ नंतर आला होता, मात्र त्यापेक्षा वेगळा आहे. त्यात हीरो स्प्लिट पर्सनॅलिटीचा शिकार असतो. यात हीरोला मेमरी लॉसची समस्या असते.

अजय, अनीस आणि इतरांचे सहकार्य मिळाले

अनिल सांगतात....चित्रपटावर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जारी करताना अजयने कोणताही वाद घातला नाही. त्याचा प्रचारही ते करतील. त्यांनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काची मागणी केलेली नाही. केवळ अजयच नाही तर दिग्दर्शक अनीस बज्मी आणि बाकीच्या स्टारकास्टनेही कोणत्याही रकमेची मागणी केलेली नाही. हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, असे प्रत्येकाला वाटते. चित्रपटात कोणताही बदल करणार नाही. जुना असूनही त्यात आजच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे.

‘भूलभुलैया २’नंतर सुरू होणार प्रमोशन, निर्माते मोठ्या प्रदर्शनासाठी वचनबद्ध
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणे निर्मात्यांचे पहिले प्राधान्य असते. अनिल सांगतात... ‘आम्ही ते आधी थिएटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला वितरक आणि प्रदर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही ते १५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करू इच्छितो. तशी, आमची चर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सुरू आहे. आम्ही त्याच्या मोठ्या प्रदर्शनासाठी वचनबद्ध आहोत. जूनपर्यंत मोठे सिनेमे थिएटरमध्ये येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत तारखांवरून जोरदार भांडण होत आहे. परिणामी, आम्ही येत्या दोन ते तीन महिन्यांत ते प्रसिद्ध करण्याचा विचार करत आहोत. स्वत: अनीस बज्मी यांनीही म्हटले... ‘२० मेपर्यंत माझी बांधिलकी ‘भूलभुलैया २’ बद्दल आहे. त्यानंतर आम्ही ‘नाम’च्या प्रमोशनला सुरुवात करू.

‘द ब्रोकन न्यूज’ सिरीजमधून ओटीटीवर येणार सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रे लवकरच झी ५वरील मालिका ‘द ब्रोकन न्यूज’मधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. विनय वैकुल दिग्दर्शित फेमस ब्रिटिश मालिका ‘प्रेस’ची सुधारित आवृत्ती आहे. यामध्ये सोनालीव्यतिरिक्त जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराणा आणि किरणकुमार दिसणार आहेत. सोनालीने या मालिकेचा एक छोटा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले... ‘सेटवर परत येणे, सर्जनशीलतेत परत येणे, माझे सहकलाकार आणि दिग्दर्शकांशी संवाद साधणे, व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणणे, खूप छान वाटते. झी ५सह ओटीटीवर पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही एकत्र खूप काही केले आणि ते कुटुंबासारखे वाटते.” निर्मात्यांच्या मते, या शोमध्ये मुंबईतील दोन प्रतिस्पर्धी न्यूज चॅनलची कथा आहे. सोनाली शेवटची २०१३ मध्ये वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटात दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...