आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अली अब्बास जफर दिग्दर्शित:‘बड़े मियाँ छोटे मियाँ'साठी अक्षय आणि टायगर श्रॉफने कमी केले मानधन

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ लवकरच ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनणार असल्याची चर्चा होती. अक्षय आणि टायगरच्या मनाधनाच्या रक्कमही खूप जास्त आहे. आता वृत्तानुसार, चित्रपटाचे बजेट संतुलित करण्यासाठी दोन्ही स्टार्सनी त्यांच्या मानधनामध्ये कपात केली आहे. यासाठी अक्षय १४४ कोटी, टायगर ४५ कोटी आणि अली २५ कोटी घेत होता, मात्र या चित्रपटात अक्षयने आपल्या मानधनामध्ये ५० टक्के, टायगरने २० टक्के आणि अलीने ३५ टक्के कपात केली आहे.

आता या चित्रपटाचे नवे बजेट तयार झाले आहे. ‘हिरोपंती २’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर, निर्मात्यांना चित्रपटावर इतका खर्च करण्याची खात्री नव्हती. हा चित्रपट नव्या बजेटमध्ये बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे चित्रीकरण पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते. त्याचबरोबर पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित करण्याची योजना आहे.

बातम्या आणखी आहेत...