आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशराज बॅनरची हिट फ्रँचायजी असलेल्या ‘धूम’च्या चौथ्या भागामुळे ट्रेड सर्किटमध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुढच्या वर्षी या बॅनरचे ‘पठाण’ आणि ‘टायगर 3’ हे दोन मोठे चित्रपट येणार आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटानंतर म्हणजे २०२४ च्या ईदला बिग बजेट चित्रपट ‘धूम 4’ आणण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांनी आणखीही काही माहिती दिली. ते म्हणाले, ‘या फ्रँचायजीच्या चौथ्या भागाचे दिग्दर्शन करण्यासाठी संजय गढवी यांना परत बोलावले जात आहे. तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन गढवी यांच्याऐवजी विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते. आता संजय यांना ऑन बोर्ड घेण्यात येणार आहे. या भागासाठी त्यांच्याकडे अनेक कथा लिहिलेल्या आहेत.’
‘धूम’ फ्रँचायजीमध्ये अभिषेकच्या भूमिकांना कमी प्रतिसाद मिळतोय
अभिषेक बच्चन याने सीरीजच्या प्रत्येक भागात भूमिका केली आहे. तथापि, तो चौथ्या भागात असेल किंवा नाही याबाबत त्याच्या निकटवर्तीयांना शंका आहे. एका निकटवर्तीयाने सांंगितले, ‘अभिषेक आपल्या चित्रपटांच्या कथेबाबत आता खूप चोखंदळ झाला आहे. यासोबतच त्याला ही जाणीव झाली आहे की सीरिजमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. जॉन अब्राहम, ऋतिक रोशन आणि आमिर खान यांच्या या चित्रपटांतील खलनायकांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. त्यामुळे या फ्रँचायजीच्या आगामी भागात काम करण्याबाबत त्याला फारशी उत्सुकता नाही. त्यामुळे शक्यता अशी आहे की चौथ्या भागात दिसणार नाही. कथा न आवडल्यामुळे त्याने याआधी ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटालाही नकार दिला होता.’
‘पृथ्वीराज’च्या वेळी अक्षयकडे या चित्रपटाचा प्रस्ताव
तथापि, त्याच्या निकवर्तीयांनी नकारात्मक भूमिकांबाबत प्रॉडक्शन हाऊसची आतापर्यंतची रणनितीही जाहीर केली. ते म्हणाले, ‘खरे पाहता निर्माते प्रत्येकवेळी नकारात्मक भूमिकेसाठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारला घेऊ इच्छितात. जॉन अब्राहमपासून ही पंरपरा सुरू झाली. नंतर ऋतिक रोशन आणि आमिर खान आले. आगामी चौथ्या भागात नकारात्मक भूमिकेसाठी अक्षय कुमारला घेण्याची तयारी आहे. निर्मात्यांनी ‘पृथ्वीराज’च्या वेळीच ‘धूम 4’साठी अक्षयकुमारशी संपर्क साधला होता. अक्षयने ‘रोबोट 2.0’मध्ये रजनीकांतच्या समोर नकारात्मक भूमिका केली होती. आता पुन्हा त्याचे चाहते त्याला नकारात्मक भूमिकेत पाहतील.’
दुसऱ्या बाजूचे म्हणणे -‘सध्या प्रॉडक्शन हाउसकडून चित्रपटाची कोणतीही तयारी नाही’
सूत्र पुढे सांगतात, ‘धूम 4’च्या नंतर पुढे पाच, सहा आणि सातवा भागही तयार होईल. त्यामध्ये निर्माते नकारात्मक भूमिकांसाठी सलमान, शाहरुख, रणबीर, रणवीर, शाहीदलाही घेऊ शकतात. या अभिनेत्यांना त्यांचे चाहते कसे स्वीकारतात, हे पाहणे रंजक असेल. तथापि, की या सर्व अभिनेत्यांनी आपल्या कारकीर्दीत नकारात्मक भूमिका करण्याची इच्छा जाहीर केली आहे. शाहरुखने तर अनेकवेळा अॅन्टी हीरो साकारला आहे. जाणकारांच्या आणि अभिषेकच्या निकटवर्तीयांच्या या दाव्यांवर दुसऱ्या बाजूचे म्हणणे असे, की ‘धूम 4 बाबत प्रॉडक्शन हाऊसकडून कोणतीही तयारी सुरू नाही, मग या भागात अभिषेक बच्चन नसेल, असा दावा कसा केला जात आहे, हे कळत नाही. सध्या बॅनरचे संपूर्ण लक्ष ‘पठाण’, ‘टायगर 3’ आणि शाहरुख-सलमानच्या चित्रपटावर आहे. आदित्य चोप्रा यांचे लक्ष स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटावरही आहे. त्यामध्ये सलमान, शाहरुख आणि ऋतिक एकत्र दिसतील. ‘धूम 4’ कशा पद्धतीने फ्लोअरवर जाईल, याबाबत निर्मात्यांकडूनच माहिती दिली गेली तर त्यावर विश्वास ठेवता येईल.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.