आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयची सहकलाकारांसोबत मस्ती:रील लाइफ बहिणींसोबत 'चिमणी उड' खेळ खेळताना दिसला अक्षय कुमार, आठवले बालपणीचे दिवस

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रक्षाबंधन' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच अक्षय संपूर्ण टीमसोबत दुबईला प्रमोशनसाठी आला होता. आता अक्षय दुबईहून परतला असून बुधवारी तो त्याच्या सहकलाकारांसह पुण्यात प्रमोशनसाठी दाखल झाला. दरम्यान, अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या रक्षाबंधन या चित्रपटातील सहकलाकारांसह विमानात चक्क 'चिमणी उड कावळा उड' हा बालपणीचा खेळ खेळताना दिसला.

अक्षयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'बहिणींसोबत लहानपणीचे खेळ खेळण्यात जी मजा आहे, ती मजा इतर कशातही नाही. अशा प्रकारे बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.' अक्षयचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. तसेच, चाहते अक्कीच्या या व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त भूमी पेडणेकर सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादी खतीब आणि स्मृती श्रीकांत यांची महत्त्वाची भूमिका आहे. आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेला 'रक्षाबंधन' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याचदिवशी आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होतोय. आता प्रेक्षक आमिर आणि अक्षय यांच्यापैकी कुणाच्या चित्रपटाला अधिक पसंतीची पावती देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिर खानसोबत करीना कपूर खान मेन लीडमध्ये झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...