आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी स्पेशल:'गुलाबो-सीताबो'मध्ये ऐकू येईल अमिताभ यांचा बदललेला आवाज , 'अग्निपथ'च्या 30 वर्षानंतर करत आहेत प्रयोग

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गुलाबो-सीताबो' हा चित्रपट पुढील महिन्यात ओटोटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांची प्रमुख भूमिका असलेल्या  'गुलाबो-सीताबो' या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. तत्पूर्वी दिव्य मराठीला चित्रपटाशी संबंधित महत्वाची माहिती मिळाली आली आहे. आणि ही महत्वाची गोष्ट म्हणजे 1990 मध्ये रिलीज झालेल्या ‘अग्निपथ’नंतर अमिताभ यांचा बदलेला आवाज या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तब्बल 30 वर्षानंतर बिग बींनी आपल्या आवाजासोबत प्रयोग केला आहे. त्यांचा वेगळ्या लूकसोबतच आवाजातील बदल यात या चित्रपटात असणार आहे. 'अग्निपथ' या चित्रपटात त्यांनी आपल्या आवाजासोबत पहिल्यांदा वेगळा प्रयोग केला होता.   

  • काहीशी अशी आहे चित्रपटाची कहाणी

या चित्रपटात अमिताभ लखनौच्या हवेलीचे मालक मिर्झाची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या हवेलीत आयुष्मान खुराना भाडेकरू म्हणून राहतो. मिर्झाबरोबर त्याचे टॉम आणि जेरीसारखे नाते आहेत. संपूर्ण चित्रपटात मिर्झा आपली हवेली रिकामी करुन घेण्यासाठी कोणकोणत्या शक्कल लढवतात त्याचे मजेशीर चित्रण यात आहे.  

बातम्या आणखी आहेत...