आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रीकरणादरम्यान अमिताभ जखमी:हालचाली-श्वासाेच्छ्वासालाही त्रास, हैदराबादतील रुग्णालयातून घरी, आता काही आठवडे विश्रांती

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाॅलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हैदराबाद येथे प्राेजेक्ट के या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाले. त्यांना हालचाली तसेच श्वासाेच्छ्वासालादेखील त्रास हाेत आहे. याबाबत बच्चन यांनी स्वत:च आपल्या ब्लाॅगद्वारे माहिती दिली आहे. हैदराबाद येथे चित्रपटाच्या एका अ‍ॅक्शन शाॅटदरम्यान जखमी झालाे आहे. रिब कार्टिलेज फाटली आहे. उजव्या बरगडीतील स्नायूला दुखापत झाली आहे. म्हणून चित्रीकरण थांबवावे लागले, असे बच्चन यांनी स्पष्ट केले.

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार हैदराबादच्या एका रुग्णालयात सीटी स्कॅन करून घरी परतलाे. बरे हाेण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदनेसाठी काही गाेळ्याही सुरू आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित प्राेजेक्ट केमध्ये दीपिका पदुकाेण, प्रभास यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९८२ मध्ये ‘कुली’च्या चित्रीकरणादरम्यान बच्चन यांना माेठी दुखापत झाली हाेती. गेल्या वर्षी दिवाळीच्या ताेंडावर बच्चन यांनी पायाची नस कापल्याची माहिती दिली हाेती. या घटनेत रक्त खूप माेठ्या प्रमाणात गेल्याने टाकेही पडले हाेते. “कुली’च्या वेळी त्यांना बरगड्याला गंभीर दुखापत झाली हाेती. डाॅक्टरांनी त्यांना काही मिनिटांसाठी क्लिनिकली डेड घाेषित केले हाेते. त्यावेळी देशभरात अमिताभ यांच्यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...