आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:पिता-पुत्र नात्यावर आधारित असेल अनुपम  खेरचा ‘प्रतीक्षा’

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून, हा ओडिया चित्रपटाचा रिमेक असणार आहे. माहितीसनुसार, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये अनुपमने ओडिया चित्रपटाच्या टीमसोबत स्टेज शेअर केला आणि सांगितले की तो ओडिया चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. ज्याचे शीर्षक ‘प्रतीक्षा' असेल. जो पिता-पुत्राच्या गुंतागुंतीच्या नात्यावर आधारित असेल. या चित्रपटाची कथा गौर हरिदास यांच्या एका लघुकथेवरून प्रेरित असून, ही कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संजय या मुलावर आधारित असेल. वडील निवृत्त होण्याच्या काही महिन्यांपूर्वीपासून वडीलांचे कर्ज फेडण्यासाठी व उपाचारासाठी तो सरकारी नोकरीच्या शोधात असतो. चित्रपटात अनुपम एका असहाय वडिलांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुपम पटनायक करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...