आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानातील पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर लष्कराच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पोलिसांनी गुप्तचर संस्था आयएसआयविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. बुधवारी खैबर पोलिस दलातील जवानांनी गणवेश घालून जोरदार घोषणाबाजी करीत सशस्त्र मोर्चा काढला. पेशावर प्रेस क्लबबाहेर निदर्शने करण्यात आली. खैबरच्या अनेक जिल्ह्यांत अशी निदर्शने झाली. पेशावर पोलिस मुख्यालयस्थित मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात १०० वर अधिक पोलिस ठार झाले होते. या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचे सांगितले जाते. यावरून पाकिस्तान सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दरम्यान, माजी गृहमंत्री व इम्रान खान यांचेे निकटवर्तीय शेख रशीद यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी माजी मंत्री फवाद चौधरींना अटक करण्यात अाली होती.
पोलिस गणवेशात आला होता आत्मघाती हल्लेखोरखैबर पख्तुनख्वा स्फोटप्रकरणी पोलिस प्रमुखांनी सांगितले की, हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशातच मुख्यालयात घुसला होता. हल्ल्यात १० ते १२ किलो टीएनटीचा वापर झाला होता.
निदर्शने करताना खैबर पोलिसांचे जवान.
३०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत १ लाख कनिष्ठही राजीनामा देण्यास तयार
खैबर पख्तुनख्वा पोलिसांचा मेमो सार्वजनिक झाला आहे. त्यानुसार, मशीद हल्ल्याची योग्य चौकशी व दोषींना शिक्षा दिली नाही तर ३०० पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अिधकारी राजीनामा देतील. ज्युनियर रँकच्या १ लाख जवानांनीही राजीनाम्याची धमकी दिली आहे.
मानवी हक्क संघटनांनंतर सत्ताधारी पार्टी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाज) उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी हल्ल्यासाठी माजी आयएसआय प्रमुख जनरल फैज हामिद यांना जबाबदार ठरवले आहे. त्या म्हणाल्या की, ‘जनरल हामिदला इम्रान डोळे, हात आणि कान संबोधायचे. तेव्हा त्यांनी अतिरेक्यांसाठी (अफगानिस्तानहून) दरवाजे का उघडले? कट्टर अतिरेक्यांना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.