आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं. आसामची राजधानी गुवाहाटी येथील फॅशन डिझायनर आणि बिझनेसवुमन रुपाली बरुआ हिच्याशी त्यांचे लग्न झाले आहे. अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ ही आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी आहे.
आशिष यांनी न्यायालयात त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत रुपालीशी लग्न केले. यावेळी रुपाली आसामच्या पारंपारिक पांढर्या आणि सोनेरी मेखला ड्रेसमध्ये दिसली. तर दुसरीकडे केरळची परंपरा लक्षात घेत आशिषने यांनी मुंडू पोशाख परिधान केला.
रुपालीशी लग्न करून खूप आनंद झाला: आशिष
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आशिष म्हणाले- वयाच्या या टप्प्यावर मी रुपालीशी लग्न केले आहे आणि मी खूप आनंदी आहे. आज सकाळी आम्ही कोर्टात लग्न केले आणि संध्याकाळी आम्ही आमच्या जवळच्या आणि प्रियजनांसाठी एक गेट टुगेदर समारंभ आयोजित केला आहे.
मीडियाशी बोलताना रुपाली म्हणाली- आम्ही काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो पण तरीही आमचा या नात्यावर विश्वास होता आणि आम्ही पुढे नेण्याचा विचार केला. आम्हा दोघांना एका इंटिमेट फंक्शनमध्ये लग्न करायचं होतं, म्हणून आम्ही कोर्टात लग्न केलं.
11 भाषांमधील 300 चित्रपटांमध्ये काम केले
आशिष विद्यार्थी हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. 1986 पासून आशिष सतत चित्रपटांमध्ये काम करत आहेत. आशिषने आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा 11 भाषांमध्ये सुमारे 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
1942 ए लव्ह स्टोरी, रात की सुबाह नहीं, सरदार, भाई, जानवर, जीत, हैदर, गुडबाय हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहेत. 1995 मध्ये द्रोहकल या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.