आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थलापती विजय विमानतळावर स्पॉट:आजूबाजूचे लोकही ओळखूही शकले नाही, युजर्स म्हणाले - आश्चर्यकारक साधेपणा

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथचा सुपरस्टार थलापती विजयला नुकतेच हैदराबाद विमानतळावर सिक्युरिटी चेक करताना स्पॉट करण्यात आले. यावेळी त्याने मास्क घातलेला होता. एवढा मोठा स्टार असूनही वागण्यात अगदी साधेपणा दिसून आल्याने चाहते त्यांचे कौतुक करताना दिसून येत आहेत. कोणत्याही बॉडिगार्डशिवाय तो विमानतळावर दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्स त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. 11 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या विजयच्या वारिसू या चित्रपटाने जगभरात 243 कोटींचा गल्ला जमवला आहे.

विजयच्या चित्रपटाची प्रचंड कमाई
थलापती विजयचा वारिसू हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 243.56 कोटींचे कलेक्शन केले आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 7.63 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 142 कोटींचे निव्वळ कलेक्शन केले, तर 76 कोटी विदेशी बाजारातून आले.

अजितच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर
विजय आणि अजित कुमार यांचे वारिसू आणि थुनिवू हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विजयच्या चित्रपटाने सुरुवातीच्या कलेक्शनमध्ये अजितच्या चित्रपटाला थोड्या फरकाने मागे टाकले. वारिसूने पहिल्या दिवशी 28.50 कोटी कमावले, तर थुनिवूने 26 कोटी कमावले.

दोन्ही चित्रपटांच्या आतापर्यंतच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, विजयचा वारीसू हा चित्रपट अजितच्या चित्रपटापेक्षा पुढे गेला आहे. अजितच्या थुनिवूने आतापर्यंत एकूण 167.94 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर वारिसूने जगभरात 243.56 कोटींची कमाई केली आहे.

चाहत्यांनी एकमेकांचे पोस्टर फाडले
दोन्ही सिनेमे रिलीज झाल्यावर दोन्ही स्टार्सचे चाहते भिडल्याचे दिसून आले. अजित कुमारच्या चाहत्यांनी विजय थलापतीच्या वारीसू या चित्रपटाचे पोस्टर फाडले. तर दुसरीकडे थलापती विजयच्या चाहत्यांनी अजित कुमारच्या थुनिवूचे पोस्टर फाडले.

बातम्या आणखी आहेत...