आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधी ‘तुम बिन’, ‘रा वन’ आणि ‘दस’सारखे चित्रपट बनवणारे अनुभव सिन्हा सलग सामाजिक बांधिलकीची चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्या बॅनरखाली आता दोन चित्रपट ‘अफवाह’ आणि ‘भीड’ येणार आहेत, तेदेखील सामाजिक विषयावर आधारित आहेत. “भीड’चे ट्रेलरदेखील रिलीज झाले आहे. चित्रपट २४ मार्च रोजी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट स्थलांतरित मजुरांवर आधारित आहे, लॉकडाऊनदरम्यान त्यांची व्यथा पूर्ण देशाला कळली. इंडस्ट्रीच्या व्यापारिक सूत्रानुसार, ‘अनुभव स्टँड घेणारा दिग्दर्शक आहे. ‘अनेक’ चित्रपटांतही ईशान्येच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. येथे त्यांनी ‘भीड’च्या माध्यमातून परप्रांतीय कामगारांचा प्रश्न मांडला आहे. संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट फॉरमॅटमध्ये शूट करण्यात आला आहे.
बॅकड्रॉपमध्ये भोजपुरी गाण्याचा वापर झाला ज्या लोकांना आपल्या शहरात काम मिळत नाही तर ते परराज्यात जाऊन काम करतात त्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. सूत्रानुसार, ‘राजकुमार राव, आशुतोष राणा, भूमी पेडणेकर, पंकज कपूर, दिया मिर्झा यात मुख्य भूमिकेत आहेत. सर्वाधिक प्रवासी मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील आहेत. त्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी अनुभव सिन्हाने हा प्रयोग केला आहे. त्यांनी पलायन आणि रिव्हर्स पलायनच्या दृश्याच्या बॅकड्रॉपमध्ये भोजपुरी गाण्याचा वापर केला आहे. अनुभवने हे गाणे डॉक्टर सागर यांच्याकडून लिहून घेतले आहे. ज्यांच्यासोबत त्यांनी मनोज वाजपेयीच्या आवाजात “मुंबई में का बा’ गाणे रचले होते.
अनुभवने डॉ. सागरला दिली गाण्याची ब्रीफ या वेळी अनुभवने डॉ. सागर यांना थोडक्यात सांगितले होते की, गाणे असे हवे की, त्यात गुलजारच्या कवितेचा सूर असावा, ज्याप्रमाणे गुलजार साहबांनी प्रवासी मजूरांच्या दु:खावर लिहिले होते... “मरेंगे तो वहीं जाकर जहां पर जिंदगी है...यहां तो जिस्म ला कर प्लग लगाए थे ! निकालें प्लग सभी ने, ‘चलो अब घर चलें’ और चल दिये सब, मरेंगे तो वहीं जा कर जहां पर जिंदगी है!
सर्वच पात्रे एका वळणावर येऊन भेटतात यात राजकुमार राव इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहेत. आशुतोष राणा सीनियर इन्स्पेक्टर आहेत. पंकज कपूर सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्या गार्डच्या पोशाखात त्यांचे पात्र आपल्या राज्यात जात असते. नंतर रस्त्यात अनेक अडचणी येतात. ते सर्व काही त्या चित्रपटात आहे. भूमी या स्थलांतरित मजुरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या भूमिकेत आहे. या सर्वांची पात्रे एका वळणावर येऊन भेटतात. ‘भीड’वर काम करणे एक भावनिक अनुभव होता चित्रपटाबद्दल बोलताना, राजकुमार राव यांनी शेअर केले की...”भीड हा २०२० मधील लॉकडाऊन आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या संघर्षाचा सार कॅप्चर करणारा चित्रपट आहे. अशा प्रकल्पाचा एक भाग होण्यासाठी मला आनंद होत आहे. प्रेक्षकांना हा अनोखा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. ‘भीड’ चित्रपटात काम करणे हा माझ्यासाठी भावनिक अनुभव होता. अनुभव सर, हे खऱ्या आयुष्यातील कथा सांगण्यात पारंगत आहेत.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.