आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इयर ऑफ ओटीटी:बॉक्स ऑफिस कलेक्शन अजून 2020 पेक्षा 74% कमी; आता डिसेंबरपर्यंत मोठ्या चित्रपटांकडून कमाईची अपेक्षा

मुंबई / विनोद यादव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 मध्ये आजपर्यंतचे सर्व बिग स्टारर चित्रपट ओटीटीवरच झाले प्रदर्शित

कोरोना निर्बंध जवळपास संपुष्टात आले असताना बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईची अपेक्षा कायमच आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या मल्टिस्टारर ‘सूर्यवंशी’ च्या २०० कोटींच्या कमाईला चित्रपट जगत चांगली बोहनी तर मानत आहे, मात्र तरीही बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत २०२० पेक्षाही ७४ टक्के मागे आहे. वास्तविक २०२० मध्ये कडक लॉकडाऊन असतानाही सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० चित्रपट जानेवारी ते मार्चच्या प्रारंभी प्रदर्शित झाले होते. त्यामुळेच बॉक्स ऑफिसची मिळकत ७८० कोटींपेक्षा अधिक राहिली. तथापि, २०२१ मध्ये बॉक्स ऑफिसची कमाई २०३ कोटींपर्यंतच पोहोचली. हे सात वर्षांतील सर्वात कमी कलेक्शन आहे. या काळात ओटीटीवर प्रदर्शित चित्रपटांची संख्या तर मोठी आहे. परंतु त्यांच्या कमाईचे आकडे उपलब्ध नाहीत. केवळ सलमान खानचा ‘राधे-योर मोस्ट वाॅन्टेड भाई’ या चित्रपटाचीच माहिती समोर आली आली होती की, या चित्रपटाचे हक्क २०० कोटींत विकले गेले. चित्रपट समीक्षक योगेश मिश्रा म्हणाले, बॉलीवूडसाठी हे वर्ष ‘इयर ऑफ ओटीटी’ ठरले. पुढील काही दिवसांत प्रदर्शित होणारा सैफ-राणी यांचा चित्रपट ‘बंटी और बबली-२’, सलमानचा ‘अंतिम-द फायनल ट्रुथ’, रणवीर सिंगचा ‘८३’ कडूनच बॉक्स ऑफिस कलेक्शन सुधारण्याची आशा आहे.

२०२१ मध्ये ओटीटी पुढे : २०२१ मध्ये अमिताभचा ‘चेहरे’, अक्षयचा‘बेल बॉटम’, सलमानचा ‘राधे-योर मोस्ट वाँटेड भाई’, अभिषेकचा ‘द बिग बुल’, विद्या बालनचा ‘शेरनी’, फरहान अख्तरचा ‘तुफान’, आणि विकी कौशलचा ‘सरदार उधमसिंह’सह अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. मोठ्या पडद्यावरील मोठा प्रदर्शित चित्रपट ‘सूर्यवंशी’च आहे.

२०२० मध्ये निर्बंधांपूर्वी ७०० कोटींवर कमाई
२०२० मध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान अजय देवगणचा ‘तान्हाजी’, टायगर श्रॉफचा ‘बागी-३’ आणि दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’सह १० हून अधिक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांची कमाई ७०० कोटींपेक्षा अधिक होती.

बातम्या आणखी आहेत...