आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्शन कॉमेडी:भारतात एक दिवस आधी प्रदर्शित होईल ब्रॅड पिटचा ‘बुलेट ट्रेन' चित्रपट

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रॅड पिट मोठ्या पडद्यावर तीन वर्षानंतर बुलेट ट्रेन चित्रपटातून पुनरागमन करत आहे. मेकर्सनी भारतात हा चित्रपट अमेरिकेपेक्षा एक दिवस आधी प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. भारतात हॉलिवूडपट प्रचंड लोकप्रिय आहेत. मागील सिनेमा ‘थॉर लव्ह अँड थंडर'ला अफाट यश मिळाले होते. त्यामुळे मेकर्सनी अमेरिकेपेक्षा आधी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट ४ ऑगस्टला सिनेमागृहात झळकेल. भारतात तो इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. डेव्हिड लीच यांनी दिग्दर्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...