आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:‘सर्कस’ थीमवर बनले आहे यावेळी ‘बिग बॉस’चे घर, 200 जणांच्या टीमने मिळून तयार केले

किरण जैन। मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी व्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १६ वा हंगाम सुरू झाला आहे. यावेळीही हा शो सलमान खान होस्ट करत आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही ‘बिग बॉस’चे घर अत्यंत शानदार आहे. त्याची काही छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. घर आतून कसे दिसणार आहे, हे या छायाचित्रांतून स्पष्ट होईल. गेल्या अनेक वर्षांपासून आर्ट डिझायनर आणि चित्रपट दिग्दर्शक ओमंग कुमार आणि त्यांच्या पत्नी वनिता या घराचे डिझाइन करत आहेत. यावेळीही त्यांनीच हा सेट तयार केला आहे. दैनिक भास्करसोबत अलीकडेच विशेष चर्चेदरम्यान ओमंग यांनी घराच्या रचनेशी संबंधित काही विशेष बाबी शेअर केल्या. ‘सर्कस’च्या थीमवर चर्चा करताच निर्मात्यांनी लागलीच होकार दिला ओमंग म्हणाले, ‘गेल्या हंगामातच आम्ही या हंगामाची थीम ठरवली होती. वनिता आणि मी गेल्या काही वर्षांपासून ‘सर्कस’ थीमबद्दल विचार करत होतो, पण आता १६ व्या हंगामात हा विचार प्रत्यक्षात उतरला. आम्ही शोच्या निर्मात्यांशी या थीमबाबत चर्चा केली, त्यांनीही लागलीच होकार दिला. यंदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही असे सर्कस घेऊन येणार आहोत की ते पाहिल्यानंतर सारेच आश्चर्यचकित होतील. एक काळ होता जेव्हा लोक सर्कस खूप पाहायचे, पण आता तो काळ संपला हे. या शोच्या माध्यमातून आम्ही तो काळ परत आणणार आहोत.

जोकरचा चेहरा, मौत का कुआं आहे घराचे मुख्य आकर्षण ओमंग म्हणतात, ‘घराच्या आत मोठे झोके बांधण्यात आले आहेत. डायनिंग टेबल झोक्यासारखेच बनवले आहे. प्रवेश करताच जोकरचा चेहरा दिसतो. त्यातून स्पर्धकांचा प्रवेश होईल. यासोबतच एक मोठा सोफा असून आम्ही त्याला घोड्याचे रूप दिले आहे. मौत का कुआं तयार केला आहे, नेहमी जेथे किचन असायचे तेथे आम्ही लिव्हिंग रूम तयार केली आहे. लाऊंज घराच्या कोपऱ्यात हलवण्यात आले आहे. एक नव्हे तर पाच बेडरूम तयार केल्या आहेत. त्यापैकी एक कॅप्टनची असेल, उर्वरित ४ बेडरूम अन्य स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. या बेडरूमसाठीही खूप भांडणे होणार आहेत. याशिवाय एक ब्लॅक अँड व्हाइट रूम, फायर रूम आणि व्हिन्टेज रूमही पाहायला मिळेल.

स्पर्धकच बनतील राजा, जोकर आणि रिंगमास्तर अोमंग सांगतात, ‘यापूर्वीही माझ्या पेंटिंग्ज घरात लागल्या होत्या, मात्र त्या खूप लहान होत्या. यावेळी लाऊंज एरियात माझी मोठी पेंटिंग लागली आहे. सर्कशीत साधारणपणे लाल, पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. आम्हीही याच बाबीचा विचार करून रंगांची निवड केली आहे. शोमध्ये जोकर कोण होईल, राजा कोण होईल, रिंगमास्तर कोण होईल आणि गेमचेंजर कोण असेल, हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. एकंदर, पहिल्यांदा जो घराला पाहिल त्याला वाटेल की काहीतरी गोंधळ आहे. या घराच्या डिझाइनसाठी २०० जणांच्या टीमने जवळपास ६ महिने वेळ दिला आणि आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून दोन महिन्यांत हे घर तयार केले.

बातम्या आणखी आहेत...