आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम अॅक्शन थ्रिलर:क्राइम ड्रामा ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर प्रदर्शित, ऋतिक आणि सैफमध्ये दिसला विक्रम-वेताळसारखा खेळ

किरण जैन। मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मा गील काही महिन्यांत अनेक मोठे हिंदी चित्रपट एकानंतर एक फ्लॉप होत गेले. आता काही असे चित्रपट आहेत जे हिट होतील अशी अपेक्षा आहे. यात आज प्रदर्शित होणारा ‘ब्रह्मास्त्र’ आणि ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा ऋतिक रोशन आणि सैफअली खान यांचा ‘विक्रम-वेधा’ हा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये ऋतिक आणि सैफ यांच्यात विक्रम-वेताळसारखा खेळ दिसला. बॉक्स ऑफिसच्या दृष्टिकोनातून ऋतिकसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. ऋतिकच्या ‘काबिल’ (१२६.८५ कोटी), ‘सुपर 30’ (१४६.१० कोटी) आणि ‘वॉर’ (३१९ कोटी) या शेवटच्या तीन चित्रपटांनी मोठे यश मिळवले होते. गेल्या १० वर्षांत ऋतिकने एकूण ७ चित्रपट केले, त्यापैकी के‌वळ एक फ्लॉप ठरला.

विषय निवडण्याचा ऋतिकचा दृष्टिकोन अत्यंत योग्य : गिरीश जौहर चित्रपट निर्माते गिरीश जौहर यांच्यानुसार विषय निवडताना ऋतिक खूप विचार करतो. त्याचा हा दृष्टिकोन बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरतो. गिरीश म्हणतात, ‘ऋतिक मोठा स्टार आहे आणि त्याचे चित्रपट येणार असतात तेव्हा फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट उद्योगाशी संबंधित लोकांनाही त्यापासून अपेक्षा असतात. तो आपल्या चाहत्यांना समोर ठेवूनच चित्रपटांची निवड करतो. एकाचवेळी बऱ्याच गोष्टी करणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो नाही. तो दर्जावर अधिक लक्ष केंद्रित करतो. त्याचा हा दृष्टिकोन आतापर्यंत त्याच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. कोविडच्या आधी त्याचे ३ चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सहभागी झाले. यंदा अनेक सुपरस्टार प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरे ठरले नाहीत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा ऋतिकवर खिळल्या आहेत.’

सैफचे चित्रपट फ्लॉप पण त्याची लोकप्रियता कायम : अतुल दुसरीकडे, सैफच्या कारकिर्दीच्या आलेखावर नजर टाकली तर गेल्या १० वर्षांत त्याने एकूण १६ चित्रपट केले आहेत. यापैकी फक्त एकच ब्लॉकबस्टर हिट झाला. ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन सांगतात, ‘सैफचे मागील चित्रपट फ्लॉप झाले असले तरी त्याची लोकप्रियता घटली नाही. सतत फ्लॉप देऊनही सैफला चांगले चित्रपट मिळत आहेत. निर्मात्यांना तो आवडत आहे. सोबतच त्याचा अभिनय आणि स्टाइलमध्ये खूप बदल झाला आहे. ‘आदिपुरुष’ हा त्याचा पुढील चित्रपट असून, त्या तो खलनायक बनला आहे.’

मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ शी होईल क्लॅश ३० सप्टेंबर रोजी ‘विक्रम वेधा’सह मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन 1’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राॅय बच्चन, विक्रम, कार्थी, त्रिशा आणि जयम रवी सारखे कलाकार आहेत. चित्रपट वितरक अक्षय राठी यांच्यानुसार ३० सप्टेंबर हा प्रेक्षकांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. दोन्ही चित्रपट मोठे आहेत. या देन्ही चित्रपटांकडून आम्हा वितरकांना खूप अपेक्षा आहेत. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या जोनरचे आहेत.’

ऋतिक आणि सैफचा गत १० वर्षातील लेखाजोखा ऋतिक २०१९ - वॉर - हिट 2019 - सुपर 30 - हिट 2017 - काबिल - हिट 2016 - मोहेंजोदारो - फ्लॉप 2014 - बँग बँग - सरासरी 2013 - क्रिश 3 - हिट 2012 - अग्निपथ - हिट सैफ अली खान: 2021 - बंटी और बबली 2 - फ्लॉप 2020 - जवानी जानेमन - फ्लॉप 2020 - तानाजी : द अनसंग वॉरियर - हिट 2019 - लाल कप्तान - फ्लॉप 2018 - कालाकांडी - फ्लॉप 2017 - शेफ - फ्लॉप 2017 - रंगून - फ्लॉप 2015 - फँटम - फ्लॉप 2014 - हॅप्पी एन्डिग - फ्लॉप 2014 - हमशक्ल - फ्लॉप 2013 - बुलेट राजा - फ्लॉप 2013 - गो गोवा गॉन - सरासरी 2013 - रेस 2 - सरासरी 2012 - कॉकटेल - सेमी-हिट 2012 - एजंट विनोद - फ्लॉप

बातम्या आणखी आहेत...