आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:‘ब्लर’नंतर ठरवले आहे की स्वत:च्या प्रॉडक्शनमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांत कधीही अभिनय करणार नाही : तापसी पन्नू

अमित कर्ण। मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री म्हणाली, पात्र अंध आहे त्यामुळे डोळ्यांवर कापूस ठेवला, पट्टी बांधून रिहर्सल केली

को णत्या वेळी, कसे आणि का वाटले की निर्माता म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे? या चित्रपटाला होकार दिला त्यावेळी फक्त अभिनेत्री म्हणून त्याच्याशी संबंधित होते. साइन केल्यानंतर १० ते १२ महिन्यांनंतर चित्रपट फ्लोअरवर जाणार होता. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माती म्हणून प्रवास सुरू केला तर कसे राहील, असा विचार करण्याची संधी त्यादरम्यान मिळाली. खरे तर हा असा चित्रपट आहे जो १० वर्षांनंतर केला तरी स्वत:चा अभिमान वाटेल की तो मी केलेल्या चित्रपटांच्या यादीत आहे.

सेटवर अभिनेत्री आणि निर्माती या भूमिकांत संतुलन कसे साधले? सेटवर निश्चितपणे मी अभिनेत्रीच होते. माझे निर्माता पार्टनर प्रांजलही सेटवर असायचे. तरीही ही माझी पहिली निर्मिती असल्याने सेटवर थोडासा गोंधळ झाला की टेंशन वाढायचे. या चित्रपटानंतर मी ठरवले आहे की मी ज्या चित्रपटांची निर्मिती करीन त्यात अभिनय करणार नाही. माझ्यासाठी चांगली संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मी निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेले नाही याचा फायदाही झाला. टीमला मी हे सांगू शकले की माझ्यासमोर गुलशन देवैयासारखा चांगला अभिनेता असावा जेणेकरून आपले परफॉर्मंस उत्कृष्ट होईल.

‘डंकी’ चित्रपट तुमच्याकडे कशा पद्धतीने आला? मला राजकुमार हिरानी जी यांचा कॉल आला होता. यावेळी त्याबाबत इतकेच सांगू शकते. त्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव निश्चितच अत्यंत वेगळा होता.

या भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली? सर्वांचे म्हणणे होते की जे लोक खरेच अंध आहे, त्यांच्याप्रमाणे तयारी करावी. तथापि, मी असे सांगितले की माझे पात्र पूर्णपणे अंध नाही. त्यामुळे फार खोलवर जाऊन तयारी केली नाही. माझ्या हावभावांवरून असे वाटले पाहिजे की अंधत्व हे माझ्यासाठी नवीन आहे. ती त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. ज्यावेळी भूमिका साकारावी लागायची त्यावेळी मी अंध व्हायची. डोळ्यांत लेन्स लावायचे किंवा पट्टी बांधत असे. त्या पट्टीच्या खाली कापूसही ठेवत होते.

‘थप्पड़’, ‘पिंक’चा परिणाम खोलवर परिणाम झाला. त्याचा पुढचा भाग किंवा फ्रँचायझी येईल? अजिबात नाही. त्यासारख्या चित्रपटांची फ्रँचायझी मी अजिबात करू इच्छित नाही. ‘पिंक’चा अन्य भाषेत रिमेक आला त्यावेळी मी खूप आनंदी होते कारण त्यात काम करण्याबाबत मला विचारण्यातही आले नाही. कारण असे चित्रपट तुम्ही एकदा केलात तरी तुमचे डोके हलते. प्रत्येक यशस्वी बाबीला पुन्हा पुन्हा करता येत नाही. एखादी गोष्ट चालली की असे नाही की तुम्ही त्याबाबत अति करावे. आता ‘बदला’चा पुढचा भाग येऊ शकतो.

दुसरीकडे अभिनेता गुलशन देवैया म्हणाला... पहिले म्हणजे अभिनेत्री म्हणून तापसीची कारकीर्द कमालीची आहे. ती स्वत:च गॉडफादर, गॉडमदर आहे. तथापि, तो काळ गेला. आम्ही (आऊटसायडर्स) त्या गोष्टींपासून पुढे आलो आहोत. बाकी हे इतके प्रखर पात्र होते त्याबाबत नेहमी अभिमान वाटेल. चित्रपटांतून निवृत्त झाल्यानंतरही ते स्मरणात राहील.

बातम्या आणखी आहेत...