आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाने केले FIFA विश्वचषकाचे अनावरण:चषकाचे अनावरण करणारी पहिली भारतीय, रणवीर सिंगचीही उपस्थिती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी रात्री फिफा विश्व चषकाचे अनावरण केले. असा बहुमान मिळणारी दीपिका पहिली भारतीय ठरली आहे. आता त्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यात दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यात दीपिका पांढरा शर्ट आणि गोल्डन ओव्हर कोटमध्ये दिसली.

स्पॅनिश फुटबॉलपटूसोबत दीपिकाची एन्ट्री

दीपिकाने स्पॅनिश फुटबॉलपटू केर कासिलाससह कार्यक्रमात प्रवेश केला आणि चषकाचे अनावरण केले. 6.175 किलो वजनाचा हा चषक18 कॅरेट सोने आणि मॅलाकाइटने बनलेला आहे. केवळ काही निवडकच व्यक्तीच फुटबॉल विश्वचषकाला स्पर्श करू शकतात. यात माजी फिफा विश्वचषक विजेते आणि राष्ट्र प्रमुखांचाच समावेश आहे.

रणवीरने या सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला

यासोबतच दीपिकाच्या फॅनने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती पती रणवीर सिंगसोबत मॅच एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर मित्रासोबत मॅचबद्दल चर्चा करताना दिसतोय. तर दीपिका शांतपणे उभी मॅच बघताना दिसत आहे.

हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात झाला. जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या होत्या. तब्बल 38 वर्षांनंतर अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकला आहे. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नोरा फतेही, करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि कार्तिक आर्यनसह अनेक स्टार्स आले होते.

बातम्या आणखी आहेत...