आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 95 व्या ऑस्कर सोहळ्यासाठी अमेरिकेला रवाना झाली. ही माहिती स्वतः दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यातच तिचा विमानतळावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका क्लासी लूकमध्ये दिसली. तिने ओव्हरसाईज ब्लॅक ब्लेझरसह ब्लॅक टर्टल नेक टॉप घातला आहे. यावेळी हसत-हसत तिने पापाराझींना पोजही दिली.
95 वा ऑस्कर पुरस्कार भारतासाठी खास
12 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉली थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होणार आहे. भारताला यावेळी तीन नामांकने मिळाली आहेत. 'आरआरआर'चे 'नातू नातू' हे गाणे ऑस्करसाठी नामांकन झाले आहे. यापुर्वी 'नातू नातू' या गाण्याने गोल्डन ग्लोब आणि हॉलीवूड क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड जिंकले आहेत.
शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रीद्स'ला डॉक्युमेंटरी फीचर अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आहे. तर गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला लघुपटात नामांकन मिळाले आहे. यंदा आपण ऑस्कर पटकावणार कि नाही हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तसेच ऑस्करच्या या दिमाखदार सोहळ्यात 'नातू नातू' या गाण्यावर खास परफॉर्मन्स सादर होणार आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
12 ते 17 जानेवारीपर्यंत व्होटिंग चालली
ऑस्करसाठी एकूण 301 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची यादी 9 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. या सर्व चित्रपटांसाठी 12 ते 17 जानेवारी दरम्यान नामांकन मतदान पार पडले. अखेर 24 जानेवारी रोजी यादी बाहेर आली, ज्यामध्ये RRR अव्वल स्थानावर आहे. यावर्षी 12 मार्च 2023 रोजी 95 वा ऑस्कर सोहळा होणार आहे.
गोल्डन ग्लोबमध्ये RRRला पुरस्कार : नाटू-नाटू गाण्याने जिंकला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा अवॉर्ड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने मंगळवारी अमेरिकेत सुरू असलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात एक विशेष कामगिरी केली. चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.