आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टीस्टारर प्रोजेक्ट:रश्मिकासोबत पडद्यावर दिसेल दीपिका पदुकोण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोण आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघीही लवकरच एका प्रोजेक्टमध्ये सोबत दिसतील. त्याचे टायटल ‘मेगा ब्लॉकबस्टर’ असे आहे. याची माहिती दोघींनीही आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या प्रकल्पाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. चार सप्टेंबर रोजी ट्रेलर प्रदर्शित होईल. यात दोघींची भूमिका काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रोजेक्टमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, सौरभ गांगुली आणि कपिल शर्माही दिसतील. कामाबाबत बोलायचे झाल्यास सध्या रश्मिकाकडे बॉलीवूडचे अनेक प्रोजेक्ट आहेत. याशिवाय ती अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्येही दिसेल, तर दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...