आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकडवट शिवसैनिक आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट आज आज 13 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती.
या चित्रपटाला मिळत असलेले प्रेम पाहून प्रत्येक जण भारावून गेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने एक मोठा विक्रम केला आहे. पहिल्यांदाच एका चित्रपटाचे सर्वात मोठे होर्डिंग उभारण्यात आले असून हे होर्डिंग आशियातील सर्वात मोठे होर्डिंग असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16,800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु, आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे.
दिघेंनी स्वत:चे आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केले -
आनंद दिघे याचं यांच पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे. 27 जानेवारी 1952 मध्ये त्यांचा जन्म झाला. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात ते लहानाचे मोठे झाले. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. तेव्हा बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला दिघेंची हजेरी असायची. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांकडे ते आकर्षित झाले. दिघेंनी स्वत:चे आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केले होते. त्यांनी कुटुंबियांनाही लांब केले. जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर दिघेंनी कार्यालयात राहणे सुरू केले.
इतकंच नाही तर देवाधर्माबद्दल ते सजग होते. दिघेंनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव,पहिली दहीहंडी सुरू केली होती. त्यामुळं त्यांना 'धर्मवीर' म्हटले जाऊ लागले.आनंद दिघेंची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये इतकी वाढली होती की, त्यांना ठाण्याचे बाळसाहेब ठाकरे, असंही म्हटले गेले. दिघे यांचा 25 ऑगस्ट रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.