आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 सप्टेंबरला होणार प्रिमियर:दिलजीत आणि अमायरा यांचा ‘जोगी’ थेट नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिलजीत दोसान्झही आता ओटीटीवर पदार्पणासाठी तयार आहे. त्याचा चित्रपट ‘जोगी’ थेट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात १९८४ च्या दिल्लीची पार्श्वभूमी आहे. दंगलीदरम्यान काही मित्रांची हृदयस्पर्शी कथा त्यात पाहायला मिळणार आहे. त्याबाबत दिलजीतने सांगितले की, जोगीमध्ये भूमिका साकारणे हा सर्वाधिक आनंदी अनुभवांपैकी एक. नेटफ्लिक्सवरील पदार्पणासाठी मी अतिशय उत्साही आहे. ही सुंदर कथा जीवंत करण्यासाठी पूर्ण टीमने कठोर मेहनत घेतली आहे. अली आणि हिमांशू यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.’ अली अब्बास जफर आणि हिमांशू किशन मेहरा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अली यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यात दिलजीतशिवाय कुमुद मिश्रा, मोहम्मद, जिशान अय्युब, हितेन तेजवानी आणि अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘जोगी'चा १६ सप्टेंबर २०२२ ला नेटफ्लिक्सवर १९० हून अधिक देशात प्रिमीयर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...