आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरी जगन्नाध यांचा चित्रपट:‘लाइगर' फ्लॉप झाल्याने दिग्दर्शक जगन्नाध करणार वितरकांची नुकसान भरपाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुरी जगन्नाथ यांचा ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अनेक ठिकाणी त्याचा शो रद्द झाल्याच्या बातम्याही आल्या. अशा स्थितीत तो चित्रपटगृहांमधून लवकरच काढला जाऊ शकतो. करण जोहरच्या सहकार्याने पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता पुरी आपल्या वितरकांचे नुकसान भरून काढणार असल्याचे बोलले जात आहे. एका वितरकाने सांगितले की त्याने सुमारे ६५ टक्के गुंतवणूक गमावली आहे. या चित्रपटामुळे बरेच पैसे बुडाले आहेत. पुरी लवकरच त्यांच्याशी बोलून नुकसान भरपाई देणार आहेत. या चित्रपटासाठी विजयने जवळपास २५ कोटी रुपये मानधन घेतले होते. त्याच वेळी, त्याला चित्रपटात माइक टायसनच्या कॅमिओसाठी सुमारे २०-२५ कोटी देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...