आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सेलिब्रिटीजची वार्षिक श्रीमंताची यादी:ड्वेन जॉन्सनला एका पोस्टचे मिळतात सात कोटी, विराट व प्रियंकाला दोन कोटी रुपये

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 जणांच्या यादीत कोहली 26 व्या, तर प्रियंका 28 व्या स्थानी

भारतीय चित्रपट उद्योगातून हीरो-हिरोइन्स जितकी रक्कम एका चित्रपटासाठी घेतात तितकी रक्कम हॉलीवूडचा स्टार डे्वन जॉन्सन इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेताे. सोशल मीडिया कंपनी हॉपर एचक्यू डॉटकॉमने इन्स्टाग्रामवर कमाई करणाऱ्या सेलिब्रिटीजची वार्षिक श्रीमंताची यादी २०२० प्रसिद्ध केली आहे. यात डे्वन पहिल्या क्रमांकावर आहे. तो एका पोस्टचे १०.१५ लाख डॉलर कमावतो. १०० सेलिब्रिटीजच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली २६ व्या तर प्रियंका चोप्रा २८ व्या स्थानी आहे. या दोघांना एका पोस्टचे सुमारे २ कोटी रुपये मिळतात. तर चार वर्षांत प्रथमच किम कर्दाशिया व कायली जेनर टॉपवर जाऊ शकली नाही. 

यादीनुसार, जॉन्सनच्या कमाईत १५% वाढ झाली आहे. तर व्यावसायिक कायली जेनरची कमाई २२ टक्क्याने घटली आहे. इन्स्टाग्रामवर ड्ेवन जॉन्सनचे अकाउंट ‘द रॉक’ नावाने आहे. त्याचे १८८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर प्रियंकाचे ५४.३ दशलक्ष व विराट कोहलीचे ६६.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

0