आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Famous Singer Will Help The Cancer Patients Who Are Stuck In Mumbai Due To Lockdown Through Online Concert

मदतीचा हात:हे प्रसिद्ध गायक ऑनलाइन कॉन्सर्टद्वारे लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या कर्करोगग्रस्तांची करणार मदत 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘कोविड -19’च्या या काळात कर्करोगाशी झगडा देणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी ‘येस टू लाईफ... नो टू टोबॅको’ या विशेष ऑनलाईन संगीत रजनीचे आयोजन...

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त 7 जून रोजी रात्री 8 वाजता ‘येस टू लाइफ.. नो टू टोबॅको’ हा ऑनलाइन संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शान, कुणाल गांजावाला, सलीम-सुलेमान, नेहा भसीन या गायकांचा समावेश असेल. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी लॉकडाऊनमुळे मुंबईत उपचारासाठी अडकून पडलेल्या कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी वापरला जाईल. या रुग्णांना महिनाभर लागणारे अन्नधान्य, निवाऱ्याची सोय आणि मास्क, सॅनिटायझर इत्यादी गोष्टी पुरवण्यात येतील. विशेष म्हणजे लोकांना विनामूल्य या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

‘सीपीएए’ने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ)च्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गायक शान, कुणाल गांजावाला, सलीम मर्चंट, बेनी दयाळ, शादाब फारिदी, नेहा भसीन, ध्वनी भानुशाली, जोनिता गांधी, शिल्पा राव, अदिती सिंग, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, अनुषा मणी, ममता शर्मा आणि रसिका आदी सहभागी होणार आहेत. ‘टीकटॉक इंडिया’च्या अधिकृत हँडलवरून त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. 150 मिनिटांचा हा अखंड संगीताचा कार्यक्रम असेल. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि ‘कॅन्सर पेशंट्स अँड असोशिएशन’ या संस्थांचे हे आयोजन आहे.

‘कॅन्सर पेशंट्स अँड असोशिएशन’च्या कार्यकारी संचालिका अनिता पिटर म्हणाल्या, “तंबाखू सेवनाच्या दुष्परिणांबाबत तरुणांमध्ये जनजागृती केली जाईल. सीपीएए गेली 51 वर्षे कर्करोग रुग्णांसाठी काम करत आहे. दरवर्षी आम्ही तब्बल 3000 तोंडाच्या आणि फुप्फुसाच्या कर्करोग रुग्णांना मदत करतो. ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर हे काम अधिक महत्वपूर्ण आहे.”

बातम्या आणखी आहेत...