आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:सुशांत आत्महत्येप्रकरणी चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळींची चौकशी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांची चौकशी करतील. भन्साळी यांनी सुशांतला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. परंतु, नंतर हव्या त्या तारखा उपलब्ध होत नसल्याने हा व्यवहार फिसकटला होता. दरम्यान, निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूर यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सुशांत आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बॉलीवूडशी संबंधित २८ लोकांची चौकशी केली आहे. सुशांतने १४ जून रोजी वांद्रा येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती.

बॉलीवूडमध्येही घराणेशाही... : बॉलीवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीविषयी सुशांतच्या कुटुंबीयांनी अभियान सुरू केले आहे. यासाठी ट्विटर हँडल “नेपोमीटर’ सुरू करण्यात आले. यात आगामी चित्रपट सडक-२ला ९८ टक्के नोपोटिझम असलेला चित्रपट ठरवण्यात आले. आलिया, पूजा भटच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांचे काका मुकेश भट हे आहेत. पाच श्रेणींत मुख्य कलाकार, सहकलाकार, दिग्दर्शक व लेखक अशा आधारे चित्रपटांतील घराणेशाहीची क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

Advertisement
0