आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासनी देओल आणि अमिषा पटेल या वर्षी आगामी चित्रपट ‘गदर २’मध्ये एकत्र दिसणार आहेत. नुकताच चित्रपटातून सनीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. झी स्टुडिओने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात २०२३ मध्ये रिलीज होणाऱ्या मोठ्या प्राेजेक्ट्सची झलक दाखवण्यात आली आहे.
या व्हिडिओमध्ये सर्वात खास गदरमधील सनी देओलचा लूक आहे. व्हिडिओमध्ये सनी देओलची एक मोठी दमदार झलक दाखवण्यात आली आहे. यात तो फुल अॅक्शन फॉर्ममध्ये दिसत आहे. झी स्टुडिओने जो ५० सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात अजय देवगणचा ‘मैदान’ , सोनू सूदचा ‘फतेह’, नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘हड्डी’ आदी चित्रपटांची झलक दिसते. या व्हिडिओमध्ये सनी म्हणजेच “गदर’चा तारासिंह ओरडताना दिसत आहे. चित्रपट ‘गदर’ २२ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. त्या वेळी चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या सिक्वेलवर १५ वर्षांपासून काम सुरू आहे. चित्रपट जेथे संपला होता तेथूनच सुरू हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.