आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच होणार रिलीज:‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ सिरीजमध्ये दिसणार हर्षिल शहा

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हर्षिल शहा झी ५ आणि ’ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’मध्ये िदसणार आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना हर्षिल म्हणाला, माझ्याशी समानांतर असलेली व्यक्तिरेखा मी यात साकारत आहे. मी एक सामान्य मुलगा आहे मात्र यात माझी भूमिका एका मुघल राजपुत्राची आहे, तो त्याच्याशी कुटुंबाशी युद्ध करताे. मला या पात्रासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. जेणे करुन पात्राला न्याय देऊ शकेन. शिवाय यामुळे मी स्पष्ट उर्दू बोलू लागलो. घोड्याची स्वारी करणे आणि तलवार चालवणे मला शिकायचे होते. माझे पात्र एक तरुण आणि संघर्षशील मुघल राजकुमारचे आहे, त्याला नाईलाजामुळे आपल्या कुटुंबाशी लढावे लागते. या मालिकेत नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी, संध्या मृदुल, जरीना वहाब, आशिम गुलाटी, सुबोध भावे, नवोदित शुभम कुमार मेहरा, राहुल बोस आणि धर्मेंद्र यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...