आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Hits And Flops Are The Nature Of The Cinema Industry; The Audience Is The King, It Will Decide Our Fate'

इंटरव्ह्यू:‘हिट आणि फ्लॉप होणे ही सिनेमा इंडस्ट्रीची प्रकृती; प्रेक्षकच राजा, तोच आमचे नशीब ठरवणार’ - आलिया

अमित कर्ण। मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्ट व्यावसायिक चित्रपटांची भागीदार असूनही तिने उडता पंजाबसारखे हार्ड हिटिंग चित्रपटही केले. आता ती अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही उतरली असून शाहरुख खानसह ‘डार्लिंग्ज' चित्रपट घेऊन येत आहे. तिच्याशी केलेली ही खास बातचीत...

निर्माती बनण्याचा विचार का आला?
मला आता नेमके कारण आठवत नाही. तो विचार माझ्या मनात आला. माझ्या मते ‘डार्लिंग्स' आधी आला. त्यानंतर निर्माती बनण्याचा विचार आला. बहुतेक माझ्या मनात आणि मेंदूत ते वेडच होते. आता मीही निर्माती बनण्याची वेळ आली आहे, असे वाटले. मी दिग्दर्शक जसमीत के रिन यांची आभारी आहे.

हा चित्रपट घरगुती हिंसेविरुद्ध आहे. ‘जशास तसे’ वागण्याची भाषा करतो. काय सांगशील?
ही जशास तसे करण्याची प्रतिक्रिया आहे, असे तर मी म्हणणार नाही. आम्ही जी भूमिका करत आहोत त्यांच्या बाबतीत ही समस्या आहे. लोकांना त्या समस्येची झलक घरगुती हिंसेच्या रुपाने दिसत असावी. मात्र येथे त्या समस्येच्या निराकरणाची कथा आहे. ही फक्त बदरूच नव्हे तर तिची आई शेफाली शहाचे पात्रही समान विचारधारेचे आहे. चित्रपटात समस्या निराकरणासंदर्भात भाष्य आहे. आपण सारे जीवनात वारंवार परतून येणाऱ्या परिस्थितीविरुद्ध तोंड फिरवत असतो. येथे एक मोठी गोष्ट सांगण्यात आली आहे. मानवाने एक तर परिस्थिती बदलावी वा स्वत:ला बदलावे.

चित्रपटात घरगुती हिंसा दाखवण्यासाठी विनोदी बाज का ठेवण्यात आला आहे?
मी आणि निर्देशक जसमीत पहिल्यांदा भेटलो तेव्हा एक गोष्ट अतिशय स्पष्ट होती की, चित्रपटातून एक संदेश द्यायचा आहे. मात्र हे आपल्याला मनोरंजक पद्धतीने मांडायचे आहे. तेव्हाच त्याचा खोलवर परिणाम होईल. खासकरून जे लोक हसवतात ते नक्कीच रडवतील. आपण येथे पात्रांची चांगली युती पाहू शकतो. हा चित्रपट चांगले मनोरंजन करेल, यात शंकाच नाही.

तुझे हे पात्र पतीसाठी कोणत्या भूमिकेत आहे?
पती आपल्याशी ज्या पद्धतीने वागला त्याच पद्धतीने त्याच्याशी वागावे, असे माझे पात्र आहे. पतीने तिच्यासोबत काय केले होते? त्याबदल्यात माझ्या पात्राने काही केले तर त्याचे परिणाम काय झाले? या साऱ्या गोष्टींसाठी चित्रपट पाहावा लागेल.

भविष्यात कोणत्या प्रकारचे चित्रपट चालतील?
हे तर कोणीही सांगू शकणार नाही. काही चित्रपट चालणार, काही आपटणार हे तर गृहीतच धरावे लागेल. प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्यासाठी आपल्याला खूप मोठे कारण द्यावे लागेल, हे मात्र नक्की. महामारीनंतर खूप नोकऱ्या गेल्या. दबाव वाढला आहे. प्रेक्षक एका तिकिटावर पैसे खर्च करत असेल तरी त्याचे मोल त्याला द्यावे लागेल. चांगले चित्रपट कोणत्याही व्यासपीठावर चालतील, असे माझे मत आहे. ते कोणत्याही काळात चालतील. प्रेक्षकच राजा आहे. तोच आमचे नशीब ठरवणार.

शेफाली शहासमवेत आई-कन्येच्या नात्यासाठी काही खास तयारी केली का?
माझ्या मते आम्ही दोघींनीही सुटी घेऊन सोबत राहायला हवे होते. मात्र चित्रपटाच्या कथेतच एवढा विस्तृतपणा आहे की, त्याची काहीच गरज वाटली नाही. सोबत तुम्हाला कथेवर विश्वास असेल तर ती तुमच्यात भिनतेच. अशा बाबतीत माझ्यात आणि शेफालीत अतिशय साम्य आहे. आम्ही पठडीतील अभिनयात शिरत नाही. आम्ही दोघेही नैसर्गिक पद्धतीने काम करतो. खरे सांगायचे झाल्यास आम्ही तालिमीदरम्यानही अभिनय करत नव्हतो. कॅमेरा ऑन झाल्यानंतरच आम्ही अभिनय करायचो. ती काय करणार आणि आपण काय करावे, याबाबत मला काहीच माहीत नव्हते.

बातम्या आणखी आहेत...