आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Hot Personality Ranveer Singh Grandmother Was A Top Punjabi Actress; Ranveer Is Also A Singer, Voice Artist

चर्चेतील व्यक्तिमत्त्व:रणवीर सिंहची आजी होती अव्वल पंजाबी अभिनेत्री; गायक, व्हाॅइस आर्टिस्टही आहे अभिनेता

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका फोटोशूटमुळे चर्चेत. त्याच्याविरोधात काही ठिकाणी एफआयआरही दाखल झाले आहेत.

जन्म : 6 जुलै 1985, मुंबई
शिक्षण : बॅचलर ऑफ आर्ट, इंडियाना युनिव्हर्सिटी, अमेरिका
कुटुंब : पत्नी दीपिका पदूकोण, बॉलिवूड अभिनेत्री
मालमत्ता : 334 कोटी रु. - विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार

उत्कृष्ट अभिनय, विशेष फॅशन स्टाइल आणि एनर्जीमुळे चर्चेत असलेला बॉलीवूड अभिनेता रणवीरसिंह सध्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ‘पेपर’ या अमेरिकन मासिकासाठी केलेल्या या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली sआहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात मुंबईत एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये ठसा उमटवणारा हा कलाकार बोल्ड प्रिंट्सपासून जंप शूट आणि स्कर्ट्स घालण्यासही मागेपुढे पाहत नाही.

अभिनयासोबतच रणवीरला रॅप गाण्याचाही शौक आहे. त्याने त्याच्या गली बॉय या चित्रपटासाठी एक रॅप गाणे गायले आहे. याशिवाय त्याने स्वतःचा ‘इंक इंक’ नावाचा म्युझिक अल्बमही लाँच केला आहे. अभिनयासोबतच तो मॉडेलिंग आणि व्हॉइसओव्हरही करतो. ‘डेडपूल 2’ या हॉलिवूड चित्रपटातील डेडपूल या मुख्य पात्रासाठी त्याने व्हॉइसओव्हरही केला होता.

रणवीर अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांची मिमिक्रीही करतो. 2012 आणि 2019 मध्ये फोर्ब्ज इंडियाच्या टॉप 100 यादीतही त्यांचा समावेश झाला आहे. याशिवाय बॉलिवूडमधील कपूर घराण्याशीही त्याचे घट्ट नाते आहे. अनिल कपूरशी त्याचे नाते आहे.

प्रारंभिक जीवन : कुटुंबाकडून मिळाला अभिनयाचा वारसा
वडील जगजितसिंह भवनानी हे व्यापारी आहेत, तर आई अंजू गृहिणी आहेत. त्याच्या आजोबांचे नाव सुंदरसिंह भवनानी आणि आजीचे नाव चांद बर्क होते. आजीचा जन्म झुमरा (आता पाकिस्तानात) येथे झाला. फाळणीपूर्वी त्यांचे कुटुंब मुंबईत आले. आजोबा वास्तुविशारद आणि व्यवसायाने मोठे व्यापारी होते, तर आजी पंजाबी सिनेमातील अव्वल अभिनेत्री होत्या. त्यांच्या उत्कृष्ट नृत्यामुळे त्यांना ‘डान्सिंग लिली ऑफ पंजाब’ म्हटले जात असे. रणवीरचे वडील जगजित यांनीही अभिनेता व्हावे, अशी चांद बर्क यांची इच्छा होती, पण ते व्यापारी झाले. मग आजीनेच रणवीरला अभिनेता बनण्याची प्रेरणा दिली. रणवीरला रितिका भवनानी नावाची मोठी बहीणही आहे.

करिअर : पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार
2007 मध्ये अमेरिकेतून मुंबईत परतल्यानंतर त्याने अनेक कंपन्यांमध्ये कॉपी रायटर म्हणून काम केले. त्यानंतर त्याने चित्रपटांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. 2010 मध्ये यशराज फिल्म्स निर्मित मनीष शर्माच्या बँड बाजा बारात या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात त्याला मुख्य भूमिका मिळाली. हा चित्रपट हिट ठरला. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर रणवीरने मागे वळून पाहिले नाही. त्यांनी गोलियों की रास लीला राम लीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा, 83 सारखे यशस्वी चित्रपट केले. रणवीरने आतापर्यंत जवळपास 20 चित्रपट केले आहेत. त्याने 2021-22 मध्ये “द बिग पिक्चर” हा दूरचित्रवाणी कार्यक्रमही होस्ट केला. बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. याशिवाय त्याला स्क्रीन अवॉर्ड, गिल्ड अवॉर्ड, आयफा आणि स्टारडस्ट अवॉर्डही मिळाले आहेत.

रंजक : ख्रिश्चन कुटुंबात झाला होता आजीचा जन्म
-त्याच्या आजीचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता, त्यांना 12 भावंडे होती.
-‘पद्मावत’मधील खिलजीची व्यक्तिरेखा त्याच्या खऱ्या आयुष्यातही झळकू लागली. सामान्य स्थितीत येण्यासाठी त्याला पालकांनी शूटिंगला नेणे सुरू केले.
-चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो चित्रपटगृहात जातो, जेणेकरून प्रेक्षकांची प्रतिक्रिया कळू शकेल.
-लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना त्याने भेटवस्तूऐवजी चॅरिटीसाठी पैसे देण्याचे आवाहन केले होते.

वाद : याआधीही अश्लीलता पसरवल्याबद्दल एफआयआर
-नुकतेच त्याने न्यूड फोटोशूट केले आहे, त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.
- 2015 मध्ये एआयबी नाॅकआऊट या अडल्ट कॉमेडी शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल सार्वजनिक अश्लीलता आणि मूर्खपणाबद्दल त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता.
- इटालियन शीख समुदायाने त्याच्यावर लग्नात शीख समाजाचे नियम मोडल्याचा आरोप केला होता. त्याचा विवाह सिंधी-पंजाबी रीतिरिवाजांनुसार झाला होता.

बातम्या आणखी आहेत...