आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Hrithik Roshan's Ex Wife Sussanne Khan Is Soon Tying The Knot With Boy Friend Arslan Goni In A Hush Hush Wedding

बॉयफ्रेंड अर्सलानशी लवकरच लग्न करणार सुझान:गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसह पुर्वाश्रमीच्या पत्नीच्या लग्नात होणार सहभागी हृतिक रोशन

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 मध्ये झाला होता हृतिक आणि सुझानचा घटस्फोट

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान अनेकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. आता नुकताच आलेल्या वृत्तानुसार, इंटेरिअर डिझायनर सुझान खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत लग्न करणार आहे. या लग्नात हृतिक रोशन त्याची दोन्ही मुले, कुटुंब आणि गर्लफ्रेंड सबा आझादसोबत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, "सुझान आणि अर्सलान खूप मॅच्युअर आहेत. दोघांनाही माहित आहे की त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र घालवायचे आहे. त्यामुळेच त्यांना लग्न करायचे आहे. तर सुझानने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा गंभीरपणे विचार केला आहे. दोघेही छोटेखानी लग्न करण्याचे प्लानिंग करत आहेत. लग्नाचा कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि काही सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत."

सूत्रांनी सांगितल्यानुसार, हृतिक रोशन त्याची प्रेयसी सबा आझादसोबत लग्न करण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती, परंतु या जोडप्याने लग्न करायचे की नाही हे अद्याप ठरवलेले नाही. सुझान तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार हे निश्चित असले तरी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

सुझान-अर्सलन आणि हृतिक-सबा एकत्र पार्टी करतात

सुझान-अर्सलन आणि हृतिक-सबा अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात, हे चौघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले आहेत. सुझान-अर्सलान बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याचबरोबर हृतिक आणि सबाच्या नात्याला काही महिनेच झाले आहेत.

2013 मध्ये झाला होता हृतिक आणि सुझानचा घटस्फोट
2000 साली हृतिक आणि सुझानने लग्नगाठ बांधली होती, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, विभक्त होऊनही दोघेही आपली मुले हृहान आणि ह्रदान यांचे संगोपन करत आहेत. अनेकदा हे दोघेही मुलांसोबत एकत्र दिसत असतात.

बातम्या आणखी आहेत...