आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार:‘कृष 4’ आणि ‘रामायण’मुळे  हृतिकचा करणला नकार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हृतिक रोशन यंदा ‘विक्रम वेधा’साठी चर्चेत आहे. यासोबतच त्याच्याकडे ‘फायटर’ चित्रपटदेखील आहे. यात दीपिका पदुकोणही त्याच्यासोबत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी हृतिक आणि दीपिकाला अॅप्रोच करण्यात आल्याचे ऐकायला येत आहे. मात्र हृतिकने या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला. दीपिकाने मात्र तो स्वीकारला आहे. खरं तर हृतिककडे आधीपासूनच ‘क्रिश ४’ आणि ‘रामायण’सारखे मोठे चित्रपट आहेत. या चित्रपटांमुळे त्याने ‘ब्रह्मास्त्र २’चा भाग होण्यास नकार दिला. या दोन्ही चित्रपटात भरपूर व्हिज्युअल इफेक्ट्स वापरावे लागतात. हृतिकला आपला वेळ दुसऱ्या व्हीएफएक्स आधारित चित्रपटावर घालवायचा नाही.

बातम्या आणखी आहेत...