आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • I Don't Belong To Any Lobby, I Belong To The Orphan Community Of The Industry, The Idea Of The Film Comes From 'Common Man': Bhandarkar

मुलाखत:मी कोणत्याही लॉबीचा नाही, इंडस्ट्रीच्या अनाथ समुदायातील आहे, चित्रपटाची कल्पना ‘कॉमन मॅन’पासून सुचते  : भांडारकर

अमित कर्ण | मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अ विजात्रिक’ची कल्पना कशी काय सुचली? कोलकात्यात माझे प्रचंड चाहते आहेत. सत्यजित रे साहेबांपासून मृणाल सेन, ऋत्विक घटक यांचे सिनेमे संपूर्ण जगाबरोबर मलाही प्रेरणा देतात. ‘अभिजात्रिक’ची स्क्रिप्ट माझ्याकडे आली तेव्हा सहनिर्माते आणि माझे मित्र गौरांग जलान यांच्यासमवेत बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, एक तरुण मुलगा (शुभ्रजीत मित्रा) आहे, त्याच्याकडे एक कथा आहे. ती सत्यजित रे यांच्या ट्रिलॉजी फिल्मचा निष्कर्ष होय. मी शुभ्रजीतचे काम पाहिले नाही. मात्र त्यांनी कथा सांगितली तेव्हा चांगला चित्रपट बनेल असे वाटले. आम्ही तो ५० हून जास्त आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवला. तेथे जवळपास ४० हून जास्त प्रकारांत त्याला पुरस्कार मिळाले.

‘बबली बाउन्सर’च्या ओटीटी रिलीजवर काय प्रतिक्रिया आहेत? जेथे जातो तेथे लोक म्हणतात एवढा चांगला चित्रपट ओटीटीवर का प्रदर्शित केला? त्याचे कारणही तसेच होते. गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मी चित्रपटाची घोषणा केली. त्यावेळी आपण कोविडच्या दुसऱ्या लाटेत सापडलो होतो. ओटीटी माध्यमातून संपूर्ण कुटुंब पाहू शकेल असा चित्रपट आणण्याचा आम्ही तेव्हा निश्चय केला. लोक आता पहिल्यांदा मला म्हणाले की, मधुरजी खूप दिवसानंतर तुमचा चित्रपट आला आहे. आम्ही तो संपूर्ण कुटुंबासह पाहू शकतो. एकाने तर मला प्रतिक्रिया दिली की, मधुर यांनी तर अगदी राजश्री प्रॉडक्शन्स टाइप फॅमिली ड्रामा चित्रपट बनवला आहे.

तुमचा पहिला ‘त्रिशक्ती’ चित्रपट फ्लॉप राहिला. त्यानंतर कसे पुनरागमन केले ? तो काळ अतिशय वाईट होता. मी वाईटातील वाईट दिवसही पाहिले. खासकरून पहिला चित्रपट आपटल्यानंतर तुमचे तोंडही कोणाला पाहायचे नसते. सर्वांना दिसावे म्हणून मी पार्ट्यांमध्ये जायचो. माझा कोणीही गॉडफादर नव्हता. माझ्याकडे अतिशय घृणास्पद नजरेने पाहिले जायचे. असे असले तरी वाईट दिवसांबाबत माझी कोणाबाबतही तक्रार नाही. मी स्वतंत्र पद्धतीने काम करतो. कोणत्याही लॉबीत नाही. नेहमी म्हणतो की, अनाथ समुदायातील आहे. माझ्या चित्रपटाची कल्पना सर्वसामान्य माणसांमधूनच येते.

आगामी ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाबाबत काय सांगणार ? हा चित्रपटही ओटीटीवरच प्रदर्शित केला जाणार आहे. जयंतीलाल गडा हे आमचे रिलीजिंग पार्टनर आहेत. महामारीत मजूर वर्ग महानगरांमधून आपल्या गावाकडे कसा जातो, हे आम्ही आधी दाखवले होते. सेक्स वर्कर्सचे कसे हाल झाले, तेही दाखवले. तिसरी कथा आहना कुमारच्या एअर होस्टेस पात्राची आहे. चौथी कथा आहे, एका ज्येष्ठ नागरिकाची. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या साऱ्या कथा आपसात जोडल्या जातात. तर हा काही अँथॉलॉजीसारखा चित्रपट नाही. त्यात कथेचे आपसात नाते नाही. या साऱ्या कथा शेवटी एकत्र होतात. हीसुद्धा प्रॉपर फिचर फिल्म आहे. त्यात नाट्य, भावना, विनोदही आहे. हा माझा १५ वा चित्रपट. मी दैनिक भास्करच्या वाचकांना सांगू इच्छितो की, सर्व चित्रपट ओरिजनल राहिले. कधीही रिमेक केला नाही.

बातम्या आणखी आहेत...