आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकातील सर्वात महागडी पेंटिंग:1500 कोटींहून अधिक किमतीत विकली गेली 'मर्लिन मुनरो'ची आयकॉनिक पेंटिंग

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकॉनिक अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरो यांची पेंटिंग 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त ($195 दशलक्ष) विकली गेली आहे. ही पेंटिंग न्यूयॉर्कच्या लिलावात आतापर्यंतच्या सर्वोत्तम किमतीत विकली गेली. पेंटर अँडी वॉरहॉल यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी 1964 मध्ये ही पेंटिंग काढली होती. लिलावातून मिळणारा निधी अनाथांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे.

1500 कोटींना विकली पेंटिंग
मर्लिन मुनरोच्या पेंटिंगचे नाव "शॉट सेज ब्लू मर्लिन" आहे. मॅनहॅटन येथील क्रिस्टीच्या मुख्यालयात अवघ्या चार मिनिटांत ही कलाकृती 1500 कोटींहून अधिक रुपयांना विकली गेली. यासह, ही 20 व्या शतकातील सर्वात महाग कलाकृती बनली आहे. परंतु पोर्ट्रेट विकत घेतलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप समोर आलेली नाही. सोमवारी रात्री अज्ञात खरेदीदाराने ही कलाकृती विकत घेतल्याचे लिलावकर्त्याने सांगितले.

अनाथांसाठी वापरणार पैसे
पोर्ट्रेटच्या विक्रीतून मिळणारी रक्कम थॉमस अँड डोरिस अम्मन फाऊंडेशन झुरिचला जाईल. या फाऊंडेशनचा मुख्य उद्देश अनाथ मुलांना चित्रकलेच्या पैशातून मदत करणे हा आहे. हे अनाथ मुलांना आरोग्य सेवा आणि शिक्षण देते.

20 व्या शतकातील सर्वात महाग कलाकृती
क्रिस्टीच्या म्हणण्यानुसार, विक्रीपूर्वी या पोर्ट्रेटची किंमत सुमारे $200 दशलक्ष असण्याचा अंदाज होता. पण यापेक्षा थोड्या कमी किमतीत विकूनही त्याने 20 व्या शतकातील पूर्वीचा विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम पाब्लो पिकासोच्या 'वुमन ऑफ अल्जियर्स'च्या नावावर होता, ज्याची 2015 मध्ये 1385 कोटीत ($179.4 दशलक्ष) विक्री झाली होती. 20 व्या आणि 21 व्या शतकातील कला विभागाचे अध्यक्ष अॅलेक्स रोटर म्हणाले, "ही खूप मोठी किंमत आहे."

कोण आहे मर्लिन मुनरो?
मर्लिन मुनरोचा जन्म 1926 मध्ये लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे झाला. मर्लिन एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल होती. त्यांनी तीन विवाह केले होते, त्यांचे पहिले लग्न वयाच्या 16 व्या वर्षी झाले होते. मर्लिन मुनरोचे नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी ते गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबॉलपटू जो डिमॅगिओ यांच्याशी जोडले गेले होते. 1962 मध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला. काही लोक हा खून असल्याचेही म्हणतात, पण आजपर्यंत मर्लिनचा मृत्यू हे फक्त एक रहस्यच राहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...