आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांबद्दल केल्या गप्पागोष्टी:बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये महिलांची परिस्थिती सुधारत आहे: दिलनाज इराणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिलनाज इराणी आणि दिग्दर्शक पूर्वा नरेश यांनी अलीकडेच इंडस्ट्रीतील महिला कलाकारांसमोरील आव्हानांवर चर्चा केली. टेली प्ले ‘ओके टाटा बाय-बाय' आणि दिलनाझ स्टारर ‘शिरीन शाह' हे थिएटरच्या शक्ती महोत्सवाचा भाग आहेत. ‘शिरीन शाह' मध्ये, दिलनाजने २००२ च्या गुजरात दंगल पिडीत एका महिलेची भूमिका केली आहे, जी ११ वर्षांनंतर अचानक तिच्या अत्याचारी व्यक्तीला भेटते आणि पुन्हा एकदा तीव्र वेदना सहन करते. ती म्हणते... ‘आजही मनोरंजन विश्वात महिला कलाकारांशी भेदभाव केला जातो पण हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. थिएटरमध्ये तसा भेदभाव नसतो, पण जेव्हा मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा पुरुष अभिनेत्याला विशेषाधिकार मिळतात. तर स्त्रीला त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. मी त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा सर्वांसाठी सर्व गोष्टी खरोखरीच समान असतील. तर पूर्वाचे 'ओके टाटा बाय बाय' हे नाटक एका देह विक्रय करणाऱ्या महिलेच्या आयुष्यावर भाष्य करते. यावर ती म्हणते..."अनेक समजुती आणि पूर्वग्रह अनेक सूक्ष्म पातळ्यांवर महिलांच्या विरोधात काम करतात आणि काही वेळा महिलांचे समर्थन हे लबाडीसारखे वाटते. आजही स्त्रीला पदार्पण करणे अवघड आहे. तर पुरुषाला तितक्या आव्हानांचा सामना करावा लागत नाही

बातम्या आणखी आहेत...