आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • In The Next 4 Months, 10 Hollywood Films And 6 Southern Films Will Be Screened; Bollywood Is Still Under Consideration

बॉक्स ऑफिस अपडेट:पुढच्या 4 महिन्यांत हॉलीवूडचे 10, तर दक्षिणेचे 6 चित्रपट होणार प्रदर्शित; बॉलीवूड अजून विचारातच

मुंबई11 दिवसांपूर्वीलेखक: अमित कर्ण
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दीर्घकाळ बंद असलेली चित्रपटगृहे आता उघडली आहेत तरीदेखील बऱ्याच ठिकाणी हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. दरम्यान, दिबाकर बॅनर्जीचा ‘संदीप और पिंकी फरार’, अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ आणि अमिताभ बच्चनचा ‘चेहरे’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाले, मात्र यांना हवा तास प्रतिसाद मिळाला नाही. आता या वर्षीच्या अखेरपर्यंत हिंदी सिनेसृष्टीकडून फक्त ‘थलायवी’ आणि ‘तडप’सारखे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘पृथ्वीराज’चे िनर्माते सणाला चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र याविषयी काही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे बॉलीवूडला धोका असल्याचे व्यापार विश्लेषक म्हणत आहेत.

दुसरीकडे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श सांगतात, “सप्टेंबरपासून ते या वर्षाअखेर हाॅलीवूडच्या १० आणि दक्षिणेच्या ४ चित्रपटापेक्षा आतापर्यंत बॉलीवूडने फक्त दोनच चित्रपटाची घोषणा केली आहे. हा बॉलीवूडसाठी चिंतेचा विषय ओ. दक्षिणेचे प्रेक्षकदेखील हिंदीच्या प्रेक्षकापेक्षा वेगळी आहे. तेथे लोक चित्रपटगृहात येऊनच पिक्चर पाहतात. तेथे चित्रपटगृहाच्या किमतीदेखील कमी आहेत. त्यामुळे निर्माते आपल्या भागाबरोबरच उत्तरेतील चित्रपटगृहावरदेखील नजर ठेवून आहेत. त्यामुळे बॉलीवूडलादेखील आपले चित्रपट रिलीज करायला हवे.

५ कोटींपर्यंत जाऊ शकते "शँग ची'ची आेपनिंग
ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन यांच्या शब्दांत..‘शँग ची’ मोठा स्पेक्ट्रमचा चित्रपट आहे. माझ्या मते दोन कोटी रुपयाची ओपनिंग राहील. चित्रपटाने पाच कोटीदेखील मिळवले तरी यात नवल नाही. ‘फास्ट अँड फ्यूरियस ९’ लोकांचा आवडता चित्रपट. याची लोक वाट पाहत असतात. दक्षिणेचे चित्रपट बॉलीवूडला ओव्हरटेक करतील याविषयी सांगणे म्हणजे थोडी घाई करणे होईल. मात्र हिंदी चित्रपटासाठी स्पर्धा आणखीनच वाढली. ‘केजीएफ’ एक बळकट ब्रँड बनले आहे. तो जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला कोणी भाव दिला नाही, मात्र त्याने बॉक्स ऑफिसवर जादू केली हे जगजाहीर आहे. हॉलीवूडच्या लोकांना चित्रपटगृहात आपला चित्रपट रिलीज करण्यासाठी व्हर्च्युअल प्रिंट फीस द्यावी लागत नाही. त्यामुळे ते जास्तीत जास्त पडद्यावर प्रदर्शित करतात.

पॅन इंडियावर फोकस करताहेत दक्षिणेचे निर्माते
दक्षिणेचे निर्माते सध्या प्रभास, विजय सेतुपती, अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा, रामचरण आणि ज्युनियर एनटीआरसारख्या मोठ्या निर्मात्यांचे चित्रपट पॅन इंडिया रिलीज करत आहेत. या माध्यमातून ते या कलाकारांबरोबरच शाहरुख, हृतिक आणि आयुष्मानदेखील आम्हाला प्रिय असल्याचे उत्तर भारतीय प्रेक्षकांना दाखवत आहेत. दक्षिणेचे निर्माते आक्रमक पातळीवर मार्केटिंग करत आहेत.

दक्षिणेच्या कलाकारांची बॉलीवूडमध्ये गर्दी
- विजय सेतुपतीने आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ केला नाही मात्र त्याने हिंदीत ५ चित्रपट केले आहेत.
- प्रभासवर टी-सिरीजने बरीच गुंतवणूक केली आहे. ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’वर ‘बाहुबली’सारखा पैसा खर्च केला जाणार आहे.
- ‘केजीएफ’चे निर्माते हा चित्रपट पॅन इंडिया थिएटर्समध्ये रिलीज करू पाहत आहेत, जेणेकरून उत्तर भारतीयांमध्ये उत्साह राहील.
- करण जोहरचे बॅनर धर्मा विजय देवरकोंडावर बरीच गुंतवणूक करत आहे. त्याच्यासोबत दोन चित्रपटांवर काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...