आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:इरफानच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर पत्नी सुतापाने व्यक्त केल्या भावना, म्हणाली - माझी त्यांच्याकडे फक्त एकच तक्रार आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुतापा म्हणाल्या, इरफानकडे फक्त एकच तक्रार आहे, ती म्हणजे त्यांनी आयुष्यभरासाठी मला एक वाईट सवय लावली.

अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या दोन दिवसानंतर त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. 29 एप्रिल रोजी इरफानचे आजारपणामुळे निधन झाले आणि शुक्रवारी,  1 मे रोजी त्याची पत्नी सुतापा सिकंदरने एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. सुतापाने यात लिहिले आहे की, इरफानकडे फक्त एकच तक्रार आहे, ती म्हणजे त्यांनी आयुष्यभरासाठी मला एक वाईट सवय लावली, 

सुतापा यांनी शेअर केलेली भावनिक पोस्ट

"जेव्हा संपूर्ण जगाने याकडे वैयक्तिक नुकसान असल्याचे पाहिले तेव्हा मी फॅमिली स्टेटमेंट कसे लिहू शकते? लाखो लोक सध्या आमच्यासोबत आहेत, तेव्हा माझ्यात एकाकीपणाची भावना कशी निर्माण होऊ शकेल? मी सर्वांना खात्री देऊ इच्छिते की हा तोटा नाही, तो एक फायदा आहे. त्यांनी आम्हाला शिकवलेल्या गोष्टींचा हा फायदा आहे आणि आता आम्ही त्याची अंमलबजावणी करण्यास आणि विकसित करण्यास सुरुवात करू. तरीही मला त्याबद्दल बोलण्याचे आहे, जे लोकांना पुर्वीपासून ठाऊक नाहीये. 

हे आमच्यासाठी अविश्वसनीय आहे, परंतु मी ते इरफानच्या शब्दांत मांडले, 'ही जादू आहे.' ते येथे असोत वा नसो.  त्यांनी केलेले प्रेम एकतर्फी नव्हते. त्यांनी मला आयुष्यभरासाठी एक वाईट सवय लावली, तीच फक्त माझी एक तक्रार आहे. ती म्हणजे  परफेक्शनसाठी त्यांचा प्रयत्न मला कोणत्याही गोष्टींमध्ये साधी तडजोड करु देत नाही. एक लय होती, जी ते नेहमी प्रत्येक गोष्टीत पाहत असे. अगदी कॅकोफोनी आणि अराजकते मध्येही. म्हणून मी तालासोबत गाणे आणि नृत्य करायला शिकले आहे.

शेवटी आमचे आयुष्य एक मास्टर क्लास होते. म्हणून जेव्हा एका अनभिज्ञ अतिथीची नाट्यमय एन्ट्री झाली तेव्हा मी गोंधळातही सामंजस्य निर्माण करण्यास शिकले. डॉक्टरांचा रिपोर्ट मला स्क्रिप्ट्ससारखा  वाटला, ज्याला मी परिपूर्ण करु इच्छित होते, त्यासाठी मी कधीही त्याच्या सादरीकरणातील एकही तपशील कधीही चुकविला नाही. आम्ही या प्रवासात बर्‍याच रंजक लोकांना भेटलो आणि ही यादी अविरत आहे. पण काही लोकांचा मी येथे उल्लेख करु इच्छिते. आमचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ नितेश रोहतगी (मॅक्स हॉस्पिटल, साकेत), ज्यांनी सुरुवातीपासूनच आमची साथ दिली. डॉ. डॅन क्रेल (यूके), डॉ. शिद्रवी (यूके)... डॉ. शेवंती लिमये (कोकिलाबेन हॉस्पिटल)... 

ही यात्रा किती भव्य, सुंदर, आनंददायी आणि वेदनादायक होती हे सांगणे कठीण आहे. मला वाटते की इरफान यांनी अडीच वर्षांच्या या काळात ऑर्केस्ट्रा कंडक्टरची भूमिका साकारली होती, जी त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट होता. आम्ही 35 वर्षे एकमेकांशी जुळलो राहिलो. आमचे लग्न झाले नव्हते, ते एक मिलन होते.  मी माझ्या छोट्याशा कुटुंबांला एका होडीत पाहिले. जिथे माझे दोन्ही मुले पॅडल मारत होती आणि इरफान त्यांना कुठे जायचे आणि कुठे वळायचे यासाठी मार्गदर्शन करत होते.  पण आयुष्य सिनेमा नाही आणि इथे रीटेक नाही. म्हणून माझ्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे होडीवर स्वार व्हावे आणि वादळाचा सामना करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.

मी माझ्या मुलांना सांगितले आहे की शक्य असल्यास त्यांनी त्यांच्या वडिलांनी शिकवलेले धडे त्यांच्या जीवनात अंमलात आणावे, जे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. बाबिल: अनिश्चिततेच्या नृत्यासाठी आत्मसमर्पण करणे शिकावे आणि ब्रम्हांडावरील स्वतःच्या विश्वासावर विश्वास ठेवावा. अयान: आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे शिकावे आणि स्वतःला या नियंत्रणाखाली येऊ देऊ नये. जेव्हा आम्ही त्यांचे आवडते रातराणीचे झाड जिथे त्यांना नेत्रदीपक विजयी यात्रेनंतर दफन केले तेथे लावू तेव्हा नक्कीच अश्रू वाहतील.  यास वेळ लागतो, परंतु मोहोर होईल आणि सुगंध पसरेल आणि त्या सर्वांना स्पर्श करेन, ज्यांना मी चाहते नव्हे तर कुटुंब म्हटले."

बातम्या आणखी आहेत...