आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोड ट्रिपवर आधारित चित्रपट:फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा' चित्रपटात ईशान खट्टरची झाली एंट्री

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान खट्टर लवकरच कतरिना कैफसोबत ‘भूत पोलिस’ चित्रपटात दिसणार आहे. अधिकृत वृत्तानुसार, ईशान आता आलिया भट्ट, कतरिना आणि प्रियांका चोप्रासोबत ‘जी ले जरा’ चित्रपटातही स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात ईशानची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाली त्याच वेळी त्यांनी याला होकार दिला होता. मात्र, निर्माते त्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘डार्लिंग्स’च्या प्रमोशनदरम्यान आलियाने सांगितले होते की, याचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी मिळून याची निर्मिती करत आहेत. ईशानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘पिप्पा’ मध्ये दिसणार आहे. ईशानने 2018 मध्ये करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून सुरुवात केली होती. यात तो जान्हवी सोबत दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...