आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूट अपडेट:‘जवान’चे चित्रीकरण 65 दिवसांत झाले पूर्ण, आता शाहरुख खानसोबत सप्टेंबरमध्ये अॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण

अमित कर्ण। मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शा हरुख खानच्या ‘जवान’ या अॅटली कुमार दिग्दर्शित चित्रपटात विजय सेतूपती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ही माहिती समोर येतात त्याच्या अन्य हिंदी चित्रपटांचीही चर्चा सुरू झाली. ‘मुंबईकर’, श्रीराम राघवनचा ‘मेरी क्रिसमस’ आणि किशोर पांडुरंग बेलेकर यांचा ‘गांधी टॉक्स’ हे हिंदी चित्रपटही त्याच्या खात्यात आहेत. ‘जवान’साठी त्याला २० ते २२ कोटी रुपये शुल्क मिळाल्याची चर्चा आहे. शाहरूख खानने या आधीही आपल्यासोबतच्या कलाकारांना मोठे मानधन दिले आहे. ‘रईस’ आणि ‘झीरो’च्या क्रिएटिव्ह रायटर्सना त्याने पाच कोटी रुपयांपर्यंत मानधन दिले होते. आता तो विजयला मोठे मानधन देत आहे. शाहरुख चेन्नईमध्ये चित्रीकरण करत होता. मात्र गणपतीच्या पूजेसाठी दोन-तीन दिवसांचा अवकाश घेऊन तो मुंबईला परतला. चित्रीकरणासाठी तो पुन्हा चेन्नईला जाणार आहे. तेथे त्याच्यासोबत विजय सहभागी होईल किंवा नाही, याबाबत ठोस माहिती उपलब्ध झाली आहे.

एकूण १६० दिवसांत ‘जवान’चे चित्रीकरण होणार सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑगस्टअखेरपर्यंत चेन्नईत झालेल्या पहिल्या शेड्यूलच्या चित्रीकरणात विजय सहभागी होता. मात्र आता तो श्रीराम राघवन यांचा चित्रपट आधी पूर्ण करण्यात गुंतला आहे. इकडे, शाहरुखनेही दीपिका पदुकोण, नयनतारासोबत ऑगस्टअखेरिस फॅमिली सिक्वेंसचे चित्रीकरण केले.आता पुन्हा चेन्नईत चित्रीकरण सुरू होणार आहे. त्यात दीपिका नसेल. तेथे शाहरुखची काही अॅक्शन दृश्ये चित्रीत होणार आहेत. ते सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानंतरही ६० दिवसांचे चित्रीकरण शिल्लक राहते. संपूर्ण चित्रीकरणाचे शेड्ूल १६० दिवसांचे आहे. आतापर्यंत जवळपास ६५ दिवसांचे चित्रीकरण झाले आहे.’

राघवनच्या चित्रपटासाठी विजयने बाजारमूल्यानुसार शुल्क घेतले नाही ‘मेरी क्रिसमस’ चित्रपट विजयने फक्त ‘शगुन’ रकमेवर साइन केला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांसह चित्रपटाशी संबंधितांनीही याला दुजोरा दिला आहे. निर्माते रमेश तौरानी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले, की ‘विजय प्रत्यक्षात श्रीराम राघवन यांचा शिष्य आहे. यासोबतच दोघांचे तमिळ कनेकशनही आहे. त्यामुळे विजयने श्रीराम राघवन यांच्या सोयीनुसार विजयने आपल्या सर्व तारखा दिल्या आहेत. याशिवाय आपल्या बाजारमूल्याप्रमाणे मानधनही घेतलेले नाही.’

‘मेरी क्रिसमस’चे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण, उर्वरित सप्टेंबर अखेरपर्यंत होईल विजयच्या निकवर्तीयांनी सांगितले, की ‘त्याच्यासाठी श्रीराम राघवन यांचा चित्रपट प्राधान्याचा आहे. या चित्रपटाचे सध्या मुंबईत चित्रीकरण सुरू आहे. विजयही मुंबईत सलग चित्रीकरण करत आहे, कारण यंदा ख्रिसमला हा चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची इच्छा आहे. आतापर्यंत ८० टक्के चित्रीकरण झाले आहे. उर्वरित २० टक्के चित्रीकरण सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करायचे आहे. विजय आधी हे चित्रीकरण पूर्ण करील. नंतर तो अन्य प्रकल्पात सहभागी होईल. तथापि, शाहरूखसोबत तो चेन्नईत चित्रीकरणात सहभागी होईल किंवा नाही, याबाबत सध्या स्पष्टता नाही.’

बातम्या आणखी आहेत...