आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीझर आऊट:‘सेल्फी’च्या एका गाण्यात दिसणार जॅकलिन; लवकरच हाेणार रिलीज

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र तो पूर्णपणे आपटला. या चित्रपटात त्याच्यासोबत इम्रान हाश्मीदेखील आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे, जॅकलिन फर्नांडिस अक्षय आणि इमरानसोबत एका गाण्यात दिसणार आहे. मात्र, हे गाणे चित्रपटाच्या कथेचा भाग नसल्यामुळे निर्माते आता ट्रॅक रिलीज करण्याचा विचार करत आहेत. या गाण्याचे शूटिंग बिकानेरमध्ये झाले आहे. जॅकलीन आणि अक्षयने यापूर्वी ‘राम सेतु’ आणि ‘बच्चन पांडे’मध्ये सोबत काम केले आहे. दुसरीकडे, इम्रानसोबत जॅकलीन ‘मर्डर २’मध्ये दिसली आहे. ‘सेल्फी’ विषयी बोलायचं झालं तर अक्षय आणि इम्रान शिवाय डायना पेंटी आणि नुसरत भरूचादेखील आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत फक्त १० कोटी रुपयाची कमाई केली आहे. ‘सेल्फी’ २०१९ मध्ये आलेल्या मल्याळम ‘ड्रायविंग लायसेन्स’चा अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...