आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्हेंजर्स सीरिजमधील धनुर्धारी 'हॉकाय'चा अपघात:जेरेमी रेनरची प्रकृती गंभीर पण स्थिर, बर्फ नांगरताना झाला अपघात

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात लोकप्रिय असलेल्या अव्हेंजर्स सीरिजमध्ये धनुर्धारी 'हॉकाय'चे पात्र साकारणारा मार्व्हल स्टार जेरेमी रेनेरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बर्फाची नांगरणी करताना म्हणजेच बर्फ हटवताना झालेल्या एका अपघातात जेरेमी गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिमवृष्टीचा आनंद घेतानाचा व्हिडिओ केला होता पोस्ट

प्रकृती गंभीर पण स्थिर

जेरेमीच्या प्रतिनिधींनी हॉलीवूड रिपोर्टरशी बोलताना सांगितले की, 'जेरेमीची प्रकृती गंभीर आणि स्थिर असल्याचे आम्ही सांगू शकतो. बर्फाची नांगरणी करताना झालेल्या एका हवामानाशी निगडित अपघातात तो जखमी झाला. त्याचे कुटुंब त्याच्यासोबत आहे आणि त्याला सर्वोत्तम उपचार मिळत आहेत.' असेही ते प्रतिनिधी म्हणाले.

अपघाताचे ठिकाण माहिती नाही

बर्फाच्छादित परिसरातील जेरेमीचे हे छायाचित्र त्याने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
बर्फाच्छादित परिसरातील जेरेमीचे हे छायाचित्र त्याने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

अपघात कुठे घडला याचे नेमके ठिकाण कळू शकलेले नाही. मात्र रेनो गॅझेटी-जर्नलने म्हटले आहे की, जेरेमीचे नेवाडातील वॅशो कौंटीत अनेक वर्षांपासून घर आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलेल्या वादळादरम्यान उत्तर नेवाडात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. या हिमवृष्टीमुळे या प्रांतातील सुमारे 35 हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला.

दोन वेळा ऑस्कर नामांकन

दोन वेळा ऑस्कर नामांकन मिळालेल्या जेरेमीने अव्हेंजर्स सीरिजशिवाय इतर अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. अव्हेंजर्स सीरिजमधील धनुर्धारी हॉकाय हे पात्र त्याने साकारले होते.

हे वृत्तही वाचा...

तुनिषाला दर्ग्यात नेले नाही - शिझानच्या कुटुंबीयांचा दावा:बहिणी म्हणाल्या- तुनिषाचे कुटुंबासोबतचे नाते ठिक नव्हते, आई तिला कंट्रोल करायची

बातम्या आणखी आहेत...