आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाचा ऑस्कर सोहळा सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला आहे. 'RRR' या भारतीय चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकून इतिहास रचला. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यावेळी स्टेजवरील दीपिका पदुकोणवरुन बघणाऱ्यांची नजर हटली नाही. खुद्द क्वीन कंगना राणौतनेही दीपिकाचे कौतुक केले आहे.
कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले की, दीपिका किती सुंदर दिसत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत देशाचे नाव, प्रतिमा, शान आपल्या नाजुक खांद्यावर घेत इतक्या आत्मविश्वासाने आणि सुंदररित्या तिथे उभे राहून बोलणे सोपे नाही. दीपिकाचे स्पीच भारतीय महिला बेस्ट आहेत हेच दाखवून देते.
दीपिकाने ऑस्कर 20023 च्या मंचावरून भाषण केले. ती RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याबद्दल बोलली. ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दीपिका आत्मविश्वासाने वावरताना दिसली. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक कलरच्या वेलव्हेट ड्रेसमध्ये दीपिका एखाद्या राजकन्येप्रमाणे दिसली. बन हेअरस्टाइल व मेकअप करत करत दीपिकाने ग्लॅमरस लूक केला. शिवाय गळ्यात एक हिऱ्यांचा नेकलेस, हातात हिऱ्यांचे ब्रेसलेट आणि अंगठी अशा लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसली.
दीपिकाने ऑस्कर 2023 च्या मंचावरून भाषण केले. उपस्थितांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे दीपिकाला भाषणात पुन्हा पुन्हा थांबावे लागले. तर नाटू नाटू या गाण्यासाठी पुरस्कार जाहीर होताच संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस हे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर गेले. मंचावर किरवाणी यांनी जेव्हा भाषण देण्यास सुरुवात केली, तेव्हा दीपिका त्यांच्यासाठी टाळी वाजवताना भावूक झाल्याचे दिसून आले. दीपिकाचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कानामागे काढलेल्या टॅटूने वेधले लक्ष
दीपिकाने शेअर केलेल्या एका फोटोत तिच्या कानामागे एक टॅटू दिसतोय. या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दीपिकाने स्वत:च्या ब्रँडच्या नावाचा टॅटू केला आहे. यात 82.E असे लिहिले आहे. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी एक ब्यूटी ब्रँड सुरु केला आहे. याचे नाव 82.E असे ठेवले आहे. त्याचाच टॅटू तिने तिच्या कानाच्या मागे काढला आहे. दीपिकाच्या या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.