आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनोरंजन विश्वाला धक्का:सुशांतनंतर कन्नड टीव्ही अभिनेता सुशील गौडाने केली आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास

कर्नाटक10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशील कन्नड चित्रपटसृष्टीत स्वत: ला स्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करत होता

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्येची घटना ताजी असतानाच कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतून अशीच घटना समोर आली आहे. टीव्ही अभिनेता सुशील गौडा याने आपल्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली. 30 वर्षीय सुशील कर्नाटकातील मंड्या येथे राहत होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.  

आगामी चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार होता

सुशील अभिनेता होण्यासोबतच फिटनेस ट्रेनर देखील होता. कन्नड इंडस्ट्री स्वतःला टिकवण्याची तो सतत मेहनत घेत होता. त्याच्या आगामी 'सलगा' चित्रपटात तो पोलिसाची भूमिकेत दिसणार होता. सुशीलने अंतापुरा या रोमँटिक मालिकेतही काम केले होते.

दिग्दर्शक विजयने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

सुशील गौडाच्या  आत्महत्येची बातमी समजताच संपूर्ण इंडस्ट्री शोकात आहे. सालगाचे दिग्दर्शक दुनिया विजयने सोशल मीडिया पोस्टवर दुःख व्यक्त करत लिहिले की, मी पहिल्यांदा त्याला पाहिले तेव्हा तो मला हीरो सारखा वाटला होता. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तो आपल्याला सोडून गेला. आत्महत्या करणे कोणत्याही समस्येवर तोडगा नसतो. मला वाटते यावर्षी मृत्यूचा सिलसिला थांबणार नाही. फक्त कोरोना व्हायरसमुळे हे घडत नाहीये. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांच्या विश्वासाची कमतरता आहे. या वेळी दृढ रहा, जेणेकरून आपण या कठीण काळातून मुक्त होऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...