आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या शनिवारी द कपिल शर्मा शोवर हास्याचा धबधबा कोसळणार आहे. होस्ट कपिल शर्मा हा आपल्या आगामी झ्विगॅटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक अतिथी म्हणून शोमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटाच्या दिग्दर्शक तथा समीक्षकांनी वाखाणलेल्या दिग्दर्शिका नंदिता दास, सहकलाकार शहाना गोस्वामीही दिसणार आहेत. हास्यविनोदाचा डबल डोस देत एका सेगमेंटसाठी राजीव ठाकूर हा शोच्या होस्टच्या भूमिकेत शिरणार आहे. या वेळी तो मित्र आणि सहकलाकार कपिल शर्माला प्रश्नही विचारणार आहे.आपला अस्सलपणा आणि कळकळीत अपिलमुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत झ्विगॅटोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना नंदिता दास यांनी बरीच माहिती दिली. याबाबत त्या म्हणाल्या, “या चित्रपटात कपिल हा एका नव्या अवतारात दिसणार आहे. ते त्याच्या नेहमीच्या पंजाबी शब्दोच्चार शैलीऐवजी झारखंडी बोलीभाषेत बोलताना दिसणार आहे. त्याच्या झारखंडी शब्दोच्चार शैलीबाबत सुरुवातीला मला जरा काळजी वाटत होती. मी निवडलेल्या उच्चारशैलीत संवाद योग्यरीतीने बोलता येत नसतील तर मी त्याच्यासमोर त्याच्या पंजाबी उच्चारांत ते बोलण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र, त्याने तत्काळ माझा प्रस्ताव नाकारून लावला. तुम्ही जी शब्दोच्चार शैली निवडली आहे, त्यातच मी माझे संवाद म्हणेन, असे त्याने सांगितले. हे संवाद मूळ शैलीतच बोलण्याचे किती महत्त्व आहे, याची त्याला जाणीव होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.