आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीप्रधान चित्रपट:करिना कपूरने सुरू केले आगामी ‘द क्रू’ चित्रपटाचे शूटिंग

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिना कपूर सध्या आपल्या ‘द क्रू’ चित्रपटाविषयी चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बु ,कृती सेनन आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. नुकतेच कृतीने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले दुसरीकडे आता तिच्या एका चित्रपटाची माहिती समोर येत आहे. करिनानेदेखील याचे शूटिंग सुरू केले आहे. याची माहिती तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन करत आहेत. ‘द क्रू’ हा चित्रपट वेगवेगळ्या वयोगटातील तीन महिलांच्या आयुष्याभोवती फिरणार आहे. त्या सर्व एका संघर्षशील एअरलाइन उद्योगात काम करतात आणि त्यांच्या जीवनात भरपूर अडचणीत येतात. या तिन्ही महिलांना काहीतरी वेगळे करायचे असते, पण त्यांच्या नशिबी काहीच येत नाही. त्यांच्या आयुष्यात कसं आव्हाने येतात, ते चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. रिया कपूर आणि एकता कपूर या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करणार आहेत. रिया कपूर आणि एकता कपूर एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघींनी ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट केला होता. त्याचबरोबर करिना कपूर आणि दिलजीत दोसांझ यांचा हा तिसरा चित्रपट ठरेल. यापूर्वी दोघांनी ‘उडता पंजाब’ आणि ‘गुड न्यूज’ या चित्रपटात काम केले होते.