आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव रंजनचा प्रोजेक्ट:‘तू झूठी मैं मक्कार’मध्ये कार्तिक आर्यन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट होळीच्या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले. ते म्हणजे, कार्तिक आर्यन या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.

या वृत्ताला चित्रपटाच्या निर्मितीशी जवळीक असलेल्या एका सूत्राने दुजोरा दिला. तो पुढे म्हणाला, “कार्तिक आर्यन हा चित्रपटाचे सर्वात मोठे सरप्राइज असेल. चाहत्यांना फक्त प्रतीक्षा करावी लागेल.”कार्तिक आणि चित्रपट निर्माते लव रंजन यांची दीर्घकाळापासून मैत्री आहे. या दोघांनी ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘आकाश वाणी’ आणि ‘प्यार का पंचनामा’ यासह ४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेे. दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...