आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉरर कॉमेडी:कॉमिक बुकमध्ये दिसणार ‘भूल भुलैया 2’ चा कार्तिक आर्यन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. अनीस बज्मी यांच्या चित्रपटातील रूह बाबाच्या भूमिकेतील कार्तिकचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. आता अलीकडेच सोशल मीडियावर एक घोषणा करताना अभिनेत्याने सांगितले की, लवकरच त्याच्या पात्राला कॉमिक बुक अवतार मिळणार आहे. कॉमिक बुकचा एक फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना ही खळबळजनक बातमी सांगितली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले...

“भूल भुलैया’ या कॉमिक्समध्ये आता रूह बाबा आणि त्यांच्या कथा आल्या आहेत. हे पुस्तक माझ्या छोट्या चाहत्यांना समर्पित आहे. हे कॉमिक बुक डायमंड कॉमिक्सने प्रकाशित केले आहे. रूह बाबाच्या व्यक्तिरेखेला कॉमिक अवतार देण्याचा विचार करण्यात आला. कारण तो मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, डायमंड कॉमिक्स हे भारतातील कॉमिक्सचे सर्वात मोठे वितरक आणि प्रकाशक आहेत. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर सध्या तो या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ‘शेहजादा’ या चित्रपटात तो क्रिती सेननसोबत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...